Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून NATO संघटनेने रशियाला दिलाय ‘हा’ इशारा; पहा, युक्रेनबाबत नेमके काय म्हटलेय ?

दिल्ली : रशियाने दुसऱ्या दिवशीही आक्रमण सुरुच ठेवले आहे. आता तर रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीच्या शहराच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहे. या युद्धात युक्रेन एकाकी पडल्याचे दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांकडून अद्यापही युक्रेनला भरीव मदत मिळालेली नाही. त्यामुळे रशियाला कोणाचाही त्रास राहिलेला नाही.

Advertisement

आता मात्र रशिया विरोधात नाटो (NATO) आक्रमक होण्याची शक्यता दिसत आहे. युक्रेनमधील प्रत्येक जमिनीचे संरक्षण करणार असल्याचे नाटोने स्पष्ट केले आहे. रशियाविरुद्ध लष्करी आणि आर्थिक मदतही दिली जाईल. वास्तविक, कीवमध्ये रशियन सैनिकांनी जबरदस्त गोळीबार केला आहे. कीव शहर केव्हाही काबीज करेल, असे सांगितले जात आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या लष्कराला नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्यास सांगितले आहे.

Advertisement

रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचवेळी ते थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. युद्धातील वाढत्या जीवितहानी दरम्यान क्रेमलिनने सांगितले, की रशिया युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. पाश्चात्य नेत्यांनी आपत्कालीन बैठक आयोजित केली आहे आणि युक्रेनच्या अध्यक्षांनी असे आक्रमण थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली आहे. कारण, त्यांना भीती आहे की रशिया लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथून टाकू शकेल. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊ शकते.

Advertisement

युक्रेन विरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा करताना, पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला, की रशियन कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्यांनी याआधी कधीही पाहिले नव्हते, असे घातक परिणाम होतील. रशियन सैन्याने सांगितले, की त्यांनी कीव शहराच्या बाहेरील विमानतळ आणि पश्चिमेकडील शहराचा ताबा घेतला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युरोपियन युनियनने (European Union) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांच्या युरोपात असणाऱ्या मालमत्ता गोठवण्यास सहमती दर्शविली आहे. युरोपियन युनियनच्या तीन राजनैतिक अधिकाऱ्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. EU च्या या निर्णयानंतर दोन्ही नेत्यांची युरोपमधील संपत्ती पूर्णपणे प्रतिबंधित केली जाणार आहे. कालपासून युरोपियन युनियनच्या नेत्यांकडून नवीन निर्बंधांवर चर्चा केली जात आहे. यानंतर एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यामुळे (Russia-Ukraine War) आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत युद्ध असेच सुरू राहिल्यास मृतांचा आकडा वाढण्याची भीती कायम आहे. युक्रेनमधील लोकांनीही युद्धामुळे देश सोडण्यास सुरुवात केली आहे. हे लोक शेजारच्या देशात आश्रय घेत आहेत.

Advertisement

अर्र.. तालिबानच म्हणतोय युद्ध नको..! पहा, तालिबान्यांनी रशिया-युक्रेनला काय केलेय आवाहन..

Advertisement
Advertisement

Leave a Reply