Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. तालिबानच म्हणतोय युद्ध नको..! पहा, तालिबान्यांनी रशिया-युक्रेनला काय केलेय आवाहन..

दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. युद्धाचे परिणाम नेहमीच घातक होत असल्याने रशियाने युद्ध थांबवावे, असे आवाहन जगातील देश करत आहेत. मात्र, त्याचा काही एक परिणाम रशियावर झालेला नाही. उलट रशियाने धमकीच दिली आहे, की कुणीही या प्रकरणी हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होतील. अशा परिस्थितीत तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक घटना घडली आहे. होय, चक्क तालिबानने दोन्ही देशांना संवादाद्वारे संकट मिटवण्याचे आवाहन केले आहे. हा तो तालिबान आहे ज्याने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तावर आक्रमण करुन या देशावर कब्जा केला आहे.

Advertisement

रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती काळजी करण्यासारखी गोष्ट असल्याचे तालिबान सरकारचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी हिंसाचाराची परिस्थिती निर्माण होईल असे निर्णय घेण्यापासून परावृत्त केले पाहिजे. तालिबानचे म्हणणे आहे, की दोघांनी वादाचे मुद्दे संवादाच्या माध्यमातून सोडवावेत.

Advertisement

युक्रेनवर रशियन सैन्याचे आक्रमण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. लवकरच युक्रेन रशियाच्या ताब्यात जाईल, असा दावा रशियाकडून केला जात आहे. दरम्यान, सर्व देश रशियाला कारवाई थांबवण्यास सांगत आहेत. पाश्चात्य देश तर रशियाला धमक्या देत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर तालिबाननेही एक निवेदन जारी केले.

Loading...
Advertisement

तालिबानने एक निवेदन जारी करून दोन्ही बाजूंना (Russia and Ukraine) हिंसाचारापासून दूर राहण्याचे आणि संवादाद्वारे संकट सोडविण्याचे आवाहन केले. सध्या रशियन सैन्याने युक्रेनच्या उत्तर कीव शहरामध्ये कब्जा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने आतापर्यंत 1000 रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तर रशियानेही असे अनेक दावे केले आहेत. युद्ध थांबवण्याचे कोणतेही संकेत अद्याप रशियाने दिलेले नाहीत. त्यामुळे रशियाचे आगामी धोरण काय असेल, याचा अंदाज बांधणेही कठीण ठरत आहे.

Advertisement

अर्र.. ‘त्यामुळे’ घराच्या स्वप्नांना बसणार झटका..! रशिया-युक्रेन युद्धामुळे होणार ‘हा’ परिणाम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply