आता व्लादिमीर पुतिन यांना बसणार जोरदार धक्का..! युरोपियन युनियनने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या..
मुंबई : युरोपियन युनियनने (European Union) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांच्या युरोपात असणाऱ्या मालमत्ता गोठवण्यास सहमती दर्शविली आहे. युरोपियन युनियनच्या तीन राजनैतिक अधिकाऱ्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. EU च्या या निर्णयानंतर दोन्ही नेत्यांची युरोपमधील संपत्ती पूर्णपणे प्रतिबंधित केली जाणार आहे. कालपासून युरोपियन युनियनच्या नेत्यांकडून नवीन निर्बंधांवर चर्चा केली जात आहे. यानंतर एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यामुळे (Russia-Ukraine War) आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत युद्ध असेच सुरू राहिल्यास मृतांचा आकडा वाढण्याची भीती कायम आहे. युक्रेनमधील लोकांनीही युद्धामुळे देश सोडण्यास सुरुवात केली आहे. हे लोक शेजारच्या देशात आश्रय घेत आहेत. त्याचवेळी युक्रेनमध्ये रशियन सैन्य पाठवण्याबरोबरच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जगभरातील देशांना इशाराही दिला. ते म्हणाले की, जर रशियाच्या कारवाईत कोणत्याही देशाने हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम असे होतील, जे आतापर्यंतच्या इतिहासात कोणी पाहिलेले नाहीत.
त्याचवेळी रशियाच्या आक्रमणानंतर जपान, ऑस्ट्रेलिया, तैवान आणि इतर देशांनी रशियावर नवीन आणि कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. रशियाच्या कृत्याचाही निषेध करण्यात आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी सांगितले, की फ्रान्स आणि त्याच्या युरोपियन मित्रांनी रशियावर “अत्यंत गंभीर” आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, रशियन लोकांवर आणखी निर्बंध टाकण्याबरोबरच वित्त, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांवर शुल्क आकारला जातो. निर्बंध टाकण्याशी संबंधित कायदेशीर कागदपत्रे अंतिम केली जातील आणि शुक्रवारीच मंजुरीसाठी EU परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठवली जातील. युक्रेनलाही 1.5 अब्ज युरोची मदत देण्यात आली आहे.
आशिया आणि पॅसिफिकमधील देशांनी रशियन बँका आणि आघाडीच्या कंपन्यांविरुद्ध नवीन कारवाईस समर्थन दिले आहे. युनायटेड नेशन्सच्या (United Nations) अधिकार्यांनी युक्रेनमधील मानवतावादी कार्यांना गती देण्यासाठी $20 दशलक्ष अनुदान देण्याची घोषणा केली आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष म्हणाले, की त्यांचा देश आंतरराष्ट्रीय निर्बंधांना पाठिंबा देईल परंतु एकतर्फी निर्बंधांचा विचार करणार नाही. तैवानने शुक्रवारी जाहीर केले, की ते रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास समर्थन देतात. एकीकडे आशियातील बहुतांश देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असताना दुसरीकडे चीनने मात्र रशियावर टाकलेल्या निर्बंधांचा निषेध केला आहे.
Russia-Ukraine War : रशिया विरोधात अमेरिका आक्रमक; जर्मनीमध्ये सैनिकांना दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश