Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून रशियन लोक पुतिन यांच्यावर संतापलेत..! रशियात ठिकठिकाणी होताहेत आंदोलने; पहा, काय आहे कारण..?

दिल्ली : युक्रेनच्या विरोधात युद्धा पुकारणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आता देशातच विरोध सुरू झाला आहे. रशियन लोक पुतिन यांच्या या कृत्यावर चांगलचे संतापले आहेत. देशात ठिकठिकाणी पुतिन यांच्या विरोधात लोक आंदोलने करत आहेत. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग आणि राजधानी मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये लोकांनी युद्धाच्या निषेधार्थ मोर्चे काढले. युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांबरोबर अनेक महिन्यांच्या तणावानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले. युद्ध सुरू करण्याआधी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले होते.

Advertisement

रशियन लोकांना मात्र या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी गुरुवारी युक्रेनच्या समर्थनार्थ रॅली काढली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपमधील सर्वात मोठ्या संकटांनंतरचे हे एक संकट आहे, अशा शब्दांत लोकांनी त्याचे वर्णन केले आहे. आमची सहानुभूती युक्रेनबरोबर आहे, असे सांगत आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर जोरदार टीका केली.

Advertisement

राजधानी मॉस्कोसह रशियाच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आपला रोष व्यक्त करण्यासाठी हे लोक रस्त्यावर उतरले होते. रॅलीत सहभागी झालेल्या शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे. या रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले की, ‘युक्रेन आमचा शत्रू नाही’, ‘रशिया युद्धाच्या विरोधात आहे’, ‘आम्हाला युद्ध नको’ अशा घोषणा लोकांनी यावेळी दिल्या.

Loading...
Advertisement

दरम्यान, या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका देशातील सर्वसामान्य लोकांना बसला आहे. रशियाने अजूनही माघार घेतलेली नाही. युद्धाचा धोका कायम आहे. जागतिक पातळीवरही रशियावर जोरदार टीका होत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध टाकले आहेत. तसेच युक्रेनला मदत करण्यासाठी हे देश नियोजन करत आहेत.

Advertisement

Russia-Ukraine War : आम्ही युद्धात एकटे पडलो.. रशियाला माफ करणार नाही.. कोणी दिलाय इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply