Russia-Ukraine War : रशिया विरोधात अमेरिका आक्रमक; जर्मनीमध्ये सैनिकांना दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश
दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्धा पुकारले असून या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे अमेरिका आणि नाटो देशांनी म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र, युक्रेन संकटात असताना या देशांनी काहीच मदत केली नाही. त्यामुळे रशियाला कुणाचाही विरोध झाला नाही. आता मात्र, अमेरिकेने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. रशियाला धमकी दिल्यानंतर आता अमेरिका कारवाई करण्याच्या विचारात दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नाटो सहयोगी जर्मनीला अतिरिक्त 7 हजार सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनमधील काही प्रांतांच्या स्वतंत्रतेस मंजुरी दिल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने आणखी जोरदार हमले सुरू केले आहेत. अशी परिस्थिती असताना बायडेन यांनी हे आदेश दिले आहेत. पहिल्या दिवशीच्या लढाईत 137 जण मृत्यूमुखी पडले होते. खुद्द युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही माहिती दिली आहे.
बिडेन यांनी सांगितले, की “नाटोच्या प्रतिसादाचा एक भाग म्हणून मी आता अतिरिक्त अमेरिकन सैन्याला जर्मनीमध्ये तैनात करण्यासाठी अधिकृत करत आहे. काही सैनिक आहेत ज्यांना संरक्षण विभागाने स्टँडबाय ठेवले होते.” याआधी गुरुवारी, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली, की अमेरिकन युरोपियन कमांडचे प्रमुख जनरल टॉड वोल्टर्स यांच्या विनंतीवरून आघाडीने आपल्या संरक्षण योजना अॅक्टिव्ह केल्या आहेत. ‘द हिल’ ने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. स्टोल्टनबर्ग म्हणाले, की युक्रेनमध्ये नाटोचे कोणतेही सैन्य नाही. परंतु ते सदस्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी नाटोच्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी काम करत आहे.
दरम्यान, युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. आता अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर आणखी कठोर निर्बंध टाकण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. युरोपियन युनियन (EU) ने सर्वात कठोर आणि सर्वात हानीकारक निर्बंध पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या आहेत. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचे लक्ष्य युरोपसह संपूर्ण जगाची शांतता व्यवस्था स्थिर करणे आहे. यासाठी आम्ही सर्व मिळून रशियावर दबाव आणू.
आम्ही मोठ्या आणि लक्ष्यित निर्बंधांचे पॅकेज युरोपियन नेत्यांना परवानगीसाठी सादर करू, असे त्यांनी सांगितले. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी या निर्बंधांना “सर्वात कठोर आणि सर्वात हानीकारक” निर्बंध म्हटले. बोरेल म्हणाले, की मोठ्या अण्वस्त्रधारी देशाने आपल्या शेजाऱ्यावर हमला केला आहे आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करणार्या देशांसाठी परिणामांची धमकी देत आहे.
आधी मदत मागितली आता म्हणतोय आम्ही निराश..! पहा, भारताबाबत युक्रेनने काय म्हटलेय..?
रशिया-युक्रेन वादात वाढले भारताचे टेन्शन..! अमेरिका आणि रशिया दोघांनाही टाकलाय ‘हा’ डाव..