मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रसंगात युक्रेनने भारताकडे मदत मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर चर्चा करावी, असे आवाहन युक्रेनने केले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्याबरोबर चर्चा केली. एकूणच, या मुद्द्यावर भारताने जे धोरण घेतले आहे. त्यावर युक्रेन निराश झाला आहे.
युक्रेनचे देशातील राजदूत इगोर पोलिखा यांनी सांगितले की, भारताच्या भूमिकेमुळे आम्ही अत्यंत निराश आहोत. भारत आमची बाजू अधिक भक्कमपणे मांडेल अशी आम्हाला अपेक्षा होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे मोठे वजन आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आम्हाला अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला भारताने लगेचच प्रत्युत्तर दिले आणि युक्रेनच्या राजदूताचे आरोप फेटाळून लावले.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारतही एक पक्ष आहे. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल आणि युक्रेनमध्ये आमचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आता परिस्थिती बदलत आहे आणि भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. युक्रेनच्या आरोपांवर ते म्हणाले, की ‘आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. या मुद्द्यावर सर्व संबंधित पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. आपण एका बाजूने बोलत आहोत आणि दुसऱ्या बाजूने बोलत नाही, असे म्हणणे योग्य आहे, यावर माझा विश्वास नाही.
हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, की ‘भारताचे जगातील सर्व देशांबरोबर चांगले संबंध आहेत हे खरे आहे. अमेरिका असो, रशिया असो किंवा युरोपियन युनियन असो, सर्वांशी आमचे चांगले संबंध आहेत. UN सुरक्षा परिषदेत तणाव संपवणे हे आमचे नेहमीच लक्ष असते. राजनैतिक संवादातून समस्या सोडवता येतील, असा आमचा विश्वास आहे. युक्रेनचे राजदूत इगोर पोखिला यांच्या टिप्पणीवर हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, आम्ही सर्व पक्षांच्या संपर्कात आहोत आणि हा प्रश्न सोडवायचा आहे.
दरम्यान, अमेरिकेने भारताबरोबर संपर्क साधला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चर्चा केली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युक्रेन संकटावर चर्चा करणार आहेत.
Russia-Ukraine War : आम्ही युद्धात एकटे पडलो.. रशियाला माफ करणार नाही.. कोणी दिलाय इशारा