Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आता पुतिन यांनी जगालाच दिलीय धमकी..! पहा, जगातील देशांनी काय दिलाय गंभीर इशारा..

मुंबई : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनविरुद्ध युद्धाची (Russia-Ukraine War) घोषणा केली. त्यांनी जाहीर केले, की रशिया युक्रेनमध्ये लष्करी कारवाया करणार आहे. तेथे राहणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा दावा पुतिन यांनी केला. आपल्या एका भाषणात पुतिन म्हणाले, की युक्रेनकडून येणाऱ्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. युक्रेनवर कब्जा करण्याचा रशियाचा कोणताही हेतू नाही, असे ते म्हणाले. पुतिन म्हणाले की, युक्रेनचे सरकार रक्तपातास जबाबदार आहे.

Advertisement

पुतिन यांनी इतर देशांना चेतावणी दिली आहे, की रशियन कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर त्याचे परिणाम असे होतील की त्यांनी याआधी कधीही पाहिले नव्हते. युक्रेनला नाटोमध्ये (NATO) सामील होण्यापासून रोखण्यासाठी आणि रशियाला सुरक्षा हमी देण्याच्या रशियाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर केला. रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, रशियन लष्करी कारवाईचा उद्देश युक्रेनचे निशस्त्रीकरण सुनिश्चित करणे आहे. पुतिन म्हणाले की, शस्त्रे ठेवणारे सर्व युक्रेनियन सैनिक युद्ध क्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील. पुतिन यांच्या या घोषणेवर आतापर्यंत अमेरिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Loading...
Advertisement

युक्रेनची राजधानी कीवमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. युक्रेनमधील कीव आणि खार्किवसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील प्रश्न सोडवण्यासाठी जगातील नेत्यांकडून मुत्सद्देगिरीवर भर दिला जात आहे. यामध्ये, संयुक्त राष्ट्र (United Nations) महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये सैन्य पाठवू नये आणि शांततेने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या संकटाबाबत तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत गुटेरेस म्हणाले की संपूर्ण दिवस अफवा आणि भीतीने भरलेला होता की युक्रेनवर आक्रमण जवळ आले आहे.

Advertisement

गुटेरेस म्हणाले, की रशिया युक्रेनवर आक्रमण करेल या अफवांवर त्यांनी याआधी कधीही विश्वास ठेवला नव्हता आणि काहीही भयंकर घडणार नाही याची नेहमीच खात्री दिली जाते. त्यामुळे कोणतीही मोहीम प्रत्यक्षात तयार केली जात असेल, तर मला मनापासून इतकेच सांगायचे आहे की तुमच्या सैन्याला युक्रेनवर आक्रमण करण्यापासून रोखा. प्रश्न शांतपणे सोडवा. याआधीही अनेकांना युद्धाचे अत्यंत भयानक परिणाम सहन करावे लागले आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply