Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेन संकटात ‘त्या’ मुद्द्यावर भडकलाय ड्रॅगन; पहा, तैवानबाबत नेमके काय म्हटलेय चीनने..?

दिल्ली : युक्रेनवर रशिया करत असलेल्या (Ukraine & Russia) दाव्यांवरून सुरू असलेल्या तणावा दरम्यान चीनने तैवानची युक्रेनशी तुलना केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. चीनने बुधवारी सांगितले की, तैवान युक्रेन नाही आणि तो नेहमीच चीनचा अविभाज्य भाग राहिला आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

Advertisement

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, तैवान हे युक्रेन नाही. तो नेहमीच चीनचा अविभाज्य भाग राहिला आहे. हे एक स्पष्ट कायदेशीर आणि ऐतिहासिक सत्य आहे. गृहयुद्धामुळे तैवानचा मुद्दा चर्चेत राहिला, पण चीनच्या अखंडतेशी कधीही तडजोड केली जाऊ नये आणि कधीही तडजोड केलेली नाही.

Advertisement

याआधी चीनचा संदर्भ देत तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन म्हणाले की, बाह्य शक्ती युक्रेनमधील परिस्थिती हाताळण्याचा आणि तैवानच्या लोकांच्या मनोबलावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, आमचे सरकार या मुद्द्यावर अधिक दक्ष आहे. त्याच वेळी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, युक्रेन आणि तैवान यांच्यातील कोणत्याही तुलनेने तैवानशी संबंधित इतिहासाबद्दल लोकांमध्ये मूलभूत समज कमी असल्याचे दिसून येते. चीनने स्वयंशासित आणि लोकशाही तैवानवर सार्वभौमत्वाचा दावा केला.

Advertisement

खरं तर, न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तैवानच्या राष्ट्रपतीनी युक्रेनच्या संकटावर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्थापन केलेल्या कार्यगटाच्या बैठकीनंतर सर्व सुरक्षा आणि लष्करी तुकड्यांना तैवानच्या आसपासच्या परिसरावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांनी असेही सांगितले की, युक्रेन आणि तैवान भौगोलिक आणि मूलभूतदृष्ट्या खूप वेगळे आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी चीनने युक्रेन संकटावर मत व्यक्त केले होते. चीनने युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हालचालींवरून झालेल्या वादावर तसेच नवीन कारवाईवर राजनैतिक मौन पाळत संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. अमेरिका, युरोपियन युनियन आणि त्यांचे मित्र देश रशियाच्या विरोधातील संघर्षात युक्रेनला जोरदार पाठिंबा देत आहेत. पण चीनने वेगळी भूमिका घेतली आणि म्हटले होते, की रशियाच्या कायदेशीर सुरक्षेचा आदर केला पाहिजे. पण युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या पुतिनच्या हालचालींबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले होते.

Advertisement

मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणात युक्रेनचा मुद्दा ठळकपणे समोर आला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ब्लिंकेन यांनी युक्रेनमधील सद्यस्थितीबद्दल अमेरिकेचे मत आणि स्थितीबद्दल वांग यांना माहिती दिली, तर वांग म्हणाले की चीन युक्रेनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Advertisement

तर मुजोर चीनही पुतीनच्या मार्गावर..! पहा कशी वाढू शकते जगाची डोकेदुखी

Advertisement
Advertisement

Leave a Reply