Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ukraine crisis : युक्रेनमध्ये एक महिना आणीबाणी; रशियाचा धोका रोखण्यासाठी होतोय असा प्लान..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. युक्रेनवर रशियन आक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. एक दिवस आधी रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना देशाबाहेर लष्करी बळाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. अशा स्थितीत बुधवारी युक्रेनच्या संसदेत एका कायद्यासाठी मतदान झाले. युक्रेन डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रदेशांव्यतिरिक्त 30 दिवसांची आणीबाणी लागू करण्याची योजना आखत आहे, रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी करत आहे.

Advertisement

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. रशियाच्या कठोर वृत्तीमुळे जग दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या बड्या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. दुसरीकडे, रशियाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेक मंचांवर युक्रेनने नाटोमध्ये सामील झाल्यामुळे नाराज असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रदेशांव्यतिरिक्त त्याच्या फुटीरतावादी भागात 30 दिवसांची आणीबाणी लागू करण्याची योजना आखत आहे.

Advertisement

अलीकडेच, युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेत्स्क या दोन फुटीरतावादी प्रांतांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि एक दिवस आधीच रशियन सैन्याने या भागांवर कब्जा केला. अशा स्थितीत रशियाच्या आक्रमणाच्या शक्यतेमुळे युक्रेनच्या संसदेने बुधवारी एका महत्त्वाच्या कायद्यावर मतदान केले. 351 संसद सदस्यांनीही रशियाविरुद्ध निर्बंध मंजूर केले आहेत. रशियाने अलीकडेच पूर्व युक्रेनमधील दोन फुटीरतावादी-नियंत्रित प्रदेशांचे स्वातंत्र्य ओळखले आणि तेथे रशियन सैन्याच्या तैनातीला पाठिंबा दिला.

Loading...
Advertisement

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे सांगत आहेत की युक्रेन त्यांचे राजनैतिक दरवाजे अजूनही खुले आहेत. दुसरीकडे, रशियाच्या दाव्यांचा पर्दाफाश करत अमेरिकेची खासगी कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजने मंगळवारी दावा केला की, सॅटेलाइट इमेजने रशियाचा पर्दाफाश केला आहे. हे फोटो दर्शवतात की रशियाने युक्रेनियन सीमेजवळ, दक्षिण बेलारूसमध्ये 100 हून अधिक लष्करी वाहने आणि डझनभर लष्करी तंबू तैनात केले आहेत.

Advertisement

आता रशिया त्यासाठी तयार पण, ठेवलीय ‘ही’ महत्वाची अट; पहा, काय म्हटलेय पुतिन यांनी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply