Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. 23 श्रीमंतांचे तब्बल 2.38 लाख कोटी पाण्यात.. पहा, कोणत्या संकटाचा बसलाय जोरदार झटका..?

दिल्ली : युक्रेनबरोबरच्या वाढत्या संघर्षाने रशियाच्या अब्जाधीशांना (Russia-Ukraine Conflict) मोठा धक्का बसला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, रशियातील सर्वात श्रीमंतांच्या संपत्तीत तब्बल 2,38,531 कोटी रुपयांची घट झाली आहे. युक्रेनसह चालू असलेल्या संकटामुळे श्रीमंतांना आणखी त्रास होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी मंगळवारी रशियाच्या प्रतिष्ठित कुटुंबांवर आणि व्यक्तींवर निर्बंध टाकणार असल्याचे सांगितले. याशिवाय ब्रिटनने 5 मोठ्या रशियन बँका आणि तीन रशियन श्रीमंत व्यक्तींवर बंदी घातली आहे. तसेच नॉर्ड-2 पाइपलाइन प्रकल्प जर्मनीने थांबवला आहे.

Advertisement

युक्रेनबाबत रशियाच्या निर्णयामुळे पाश्चात्य देशांबरोबरचा तणाव शिगेला पोहोचला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुहान्स्क (Donetsk Luhansk) हे दोन प्रांत स्वतंत्र प्रदेश म्हणून घोषित केले आहेत. ही दोन्ही ठिकाणे रशियन समर्थित फुटीरतावाद्यांच्या ताब्यात आहेत. रशियाच्या या निर्णयाला सर्व देशांनी विरोध केला आहे. काही काळानंतर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी आणि जपानसह अनेक देशांनी रशियावर कडक निर्बंध टाकले आहेत.

Advertisement

संपत्ती यादीनुसार, रशियातील 23 अब्जाधीशांची सध्या 343 अब्ज डॉलरची संपत्ती आहे, जी वर्षाच्या अखेरीस $375 अब्ज होती. रशियातील अनेक श्रीमंत व्यक्तींचा प्रतिबंध यादीत समावेश आहे. त्यांनाही या संकटाचा मोठा फटका बसत आहे. काही श्रीमंतांवर निर्बंध टाकल्याने त्यांची संपत्ती घटली आहे. तसेच अनेक देशांतील रशियन कंपन्या, बँकाही मोठ्या संकटात सापडल्या आहेत.

Loading...
Advertisement

संपत्ती गमावलेल्या रशियन अब्जाधीशांच्या यादीत Gennady Timchenko आघाडीवर आहेत. त्यांना यंदा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांच्या संपत्तीत यावर्षी एक तृतीयांश घट झाली आहे. Timchenko एका सोव्हिएत लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे ज्याने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर मैत्री केली. त्याच्याकडे आता सुमारे $16 अब्ज इतकी संपत्ती आहे. या वर्षी त्यांची संपत्ती सर्वाधिक 6.47 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. त्याच्या संपत्तीचा मोठा हिस्सा रशियन गॅस उत्पादक नोव्हटेकमधील (Novatek) भागीदारीद्वारे मिळाला आहे.

Advertisement

याशिवाय, नोवाटेक शेअरधारक Leonid Mikhelson संपत्तीत या वर्षी $6.2 अब्जची घट झाली आहे, तर Lukoil चे चेअरमन Vagit Alekperov यांची संपत्ती याच कालावधीत जवळपास $3.5 अब्जने कमी झाली आहे कारण ऊर्जा कंपनीचा स्टॉक जवळपास 17 टक्क्यांनी घसरला आहे.

Advertisement

आता रशिया त्यासाठी तयार पण, ठेवलीय ‘ही’ महत्वाची अट; पहा, काय म्हटलेय पुतिन यांनी..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply