Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता रशिया त्यासाठी तयार पण, ठेवलीय ‘ही’ महत्वाची अट; पहा, काय म्हटलेय पुतिन यांनी..

मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia Conflict) युद्धाची शक्यता आणि चर्चेसाठी जगभरातील देशांकडून दबाव येत असताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता सांगितले आहे, की ते चर्चा करण्यास तयार आहेत. परंतु, देशाच्या हिताकडे दुर्लक्ष करणार नाही. पुतिन म्हणाले, की ‘आपला देश चर्चेसाठी नेहमीच तयार असतो जेणेकरून तोडगा काढता येईल.’

Advertisement

ते म्हणाले, की “आम्ही चर्चा करू शकतो, परंतु आपल्या देशातील लोकांच्या सुरक्षेशी आणि देशाच्या हिताशी तडजोड केली जाऊ शकत नाही.” युक्रेनच्या डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना रशियाने मान्यता दिल्यानंतर संपूर्ण जगाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: पाश्चात्य देशांनी याला युक्रेनच्या अखंडतेवर आक्रमण म्हटले आहे. अमेरिकेनेही या दोन प्रांतांवर अनेक निर्बंध लादले आहेत.

Advertisement

पुतिन म्हणाले, की ‘मला वाटते, जो निर्णय फार आधी घ्यायला हवा होता तो आता घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रांतांना आधीच मान्यता मिळायला हवी होती. पुतिन यांनी आपल्या भाषणादरम्यान युक्रेन हा आधी रशियाचा भाग असल्याचेही सांगितले. त्याचवेळी युक्रेनचा स्वतःचा इतिहास हजारो वर्षांचा असल्याचेही सांगण्यात आले. रशियाच्या या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि नाटो (NATO) यांनी विरोध केला. त्याचवेळी पुतिन यांनी रशियन सैन्याचे आभार मानले आणि ते त्यांच्या देशाच्या हितासाठी लढत असल्याचे सांगितले. त्यांनी रशियन सैन्याच्या युद्धाच्या तयारीचेही कौतुक केले.

Loading...
Advertisement

पुतिन म्हणाले, की आम्ही प्रगत शस्त्रे बनवत राहू. त्यात हायपरसोनिक्सचाही समावेश असेल. याशिवाय आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देत आहोत. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, पुतिन म्हणाले, ही सर्व शस्त्रे भविष्यासाठी आहेत, ज्यामुळे देशाची ताकद वाढेल.

Advertisement

ब्रिटनने दिलाय पुतीन यांना झटका..! रशियाच्या प्रतिक्रियेकडे जगाचे लक्ष

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply