Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine Conflict : रशियाच्या आडमुठेपणानंतर अमेरिका, युरोपियन देशही आक्रमक.. काय घेतलाय निर्णय

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) संकटादरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती बिघडण्याची शक्यताच अधिक आहे. रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्याअंतर्गत ते आपले सैन्य (Military ) दुसऱ्या देशात कारवाईसाठी पाठवू शकतात. याबाबत पुतिन म्हणाले की, त्यांच्यासमोर सध्या सर्व पर्याय खुले आहेत.

Advertisement

दुसरीकडे, रशियाने युक्रेनमध्ये उचललेल्या या पावलांना पाश्चात्य देशांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे आधी जर्मनी आणि ब्रिटनने रशियावर निर्बंध (Restrictions) लादले होते. तिथे आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी देशाला संबोधित करताना रशियावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन (Violation of international law ) केल्याचा आरोप केला आणि रशियावर महत्त्वपूर्ण निर्बंध जाहीर करण्यात आल्याचे सांगितले.

Advertisement

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, रशियासाठी मुत्सद्देगिरीचे दरवाजे अजूनही खुले आहेत. आम्ही मुत्सद्देगिरीचे दरवाजे कधीही पूर्णपणे बंद करणार नाही. परंतु जोपर्यंत रशिया स्वतःचे काम करत नाही तोपर्यंत मुत्सद्देगिरी यशस्वी होऊ शकत नाही.

Loading...
Advertisement

मॉस्कोने युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी रशियावर आर्थिक निर्बंधांच्या पहिल्या फेरीची घोषणा केली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की, लहान, मध्यम किंवा मोठा हल्ला असे काहीही नाही. हल्ला हा हल्ला असतो. आमची पहिली योजना मुत्सद्देगिरीचे प्रत्येक साधन वापरण्याची आहे. दुसरी योजना म्हणजे आपल्या प्रत्येक इंच जमिनीसाठी आणि प्रत्येक शहरासाठी आणि प्रत्येक गावासाठी लढा. अर्थात आम्ही जिंकेपर्यंत लढण्यास तयार आहोत.

Advertisement

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले की ते या आठवड्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार नाहीत. असे नाही की आम्ही युक्रेनवर आक्रमणाची सुरुवात पाहत आहोत. परंतु रशियाने राजनैतिक प्रयत्नांना सतत नकार दिल्याने हे स्पष्ट झाले आहे की ते युक्रेनवर हल्ला करू शकतात. अशा वातावरणात या बैठकीला काही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply