Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता कशी करणार कोरोनाची चौकशी..? ; पहा, चीनने काय केलाय नवा कारनामा..?

दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वुहान लॅबची जबाबदारी लष्कराच्या एका जनरलकडे दिली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, जिनपिंग यांना अजूनही कोरोना विषाणूची उत्पत्ती आणि संसर्गाचा वेगाने प्रसाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत नाही. चीनच्या या निर्णयामुळे चीनवरील संशय आधिक बळावणार आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, लॉकडाऊनबद्दल लिहिल्याबद्दल एका चिनी पत्रकाराला तुरुंगात टाकण्यात आले होते आणि एका बनावट वायरलॉजिस्टलाही तुरुंगात टाकण्यात आले होते. कोरोनाने होरपळलेल्या अवघ्या जगाला या प्रकरणात चीनची चौकशी व्हावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. चीनने नेहमीच या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: जेव्हा ऑस्ट्रेलियाने कोविड प्रकरणाच्या स्वतंत्र तपासाची मागणी केली तेव्हा चीनने या देशाविरुद्ध व्यापार युद्ध (Trade War) सुरू केले.

Advertisement

कोविड-19 ने वुहानमध्ये दोन वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे तेथे कोविड-19 च्या उत्पत्तीविषयी ठोस तथ्ये गोळा करणे सोपे नाही. या जागतिक संकटामुळे जगभर जनतेचे आणि पैशाचे मोठे नुकसान झाले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, कोविड-19 संसर्ग वुहानमधूनच जगभरात पसरला, असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेसह अन्य देशांनीही असेच म्हटले आहे. मात्र, चीनने हे आरोप कधीच स्वीकारले नाहीत. त्यामुळे वुहान येथील प्रयोगशाळेच्या तपासणीतही कायमच अडचणी उभ्या केल्या. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीनने जगातील देशांना नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी केली होती.

Loading...
Advertisement

देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 13,405 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत 34,226 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, तर या काळात 235 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, अॅक्टिव्ह प्रकरणांमध्येही घट झाली आहे. आता रुग्णांची संख्या 1,81,075 वर आली आहे. त्याच वेळी, आतापर्यंत कोरोना बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 4,21,58,510 झाली आहे. तसेच आतापर्यंत 5,12,344 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना नियंत्रणात येत असला तरी काही देशांमध्ये अजूनही या घातक आजाराचे थैमान सुरुच आहे.

Advertisement

कोरोना कधी संपणार..? ; पहा, WHO च्या वैज्ञानिकांनी काय दिलीय महत्वाची माहिती..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply