Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अजब-गजब : अवघे कोरोनाने हैराण.. पण, या 8 देशांत कोरोना आलाच नाही; पहा, देशांनी कसे रोखले या संकटाला..

दिल्ली : कोरोना विषाणूने 2019 पासून जगभरात हाहाकार उडाला आहे. या विषाणूला कोविड 19 (covid 19) असे म्हणतात कारण त्याची पहिली नोंद 2019 ची आहे. 2022 आले आणि तरीही हा विषाणू रूप बदलून अनेक देशांत थैमान घातले आहे. अनेक बलाढ्य देशांमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पण जगात असेही काही देश आहेत, जिथे आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या देशांनी सुरुवातीपासूनच अशी तयारी केली होती, त्यामुळे इथले लोक कोरोनापासून सुरक्षित आहेत. चला तर मग असे कोणते देश आहेत जिथे कोरोनालाही प्रवेश मिळाला नाही, जाणून घ्या..

Advertisement

या यादीतील पहिला देश Tokelau हा आहे. हा देश दक्षिण प्रशांत महासागराच्या जवळ आहे. या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Orgnisation) काविड मुक्त घोषित केले आहे. येथे विमानतळ नाही. अशा परिस्थितीत येथे येण्याचा मार्ग जहाजाने आहे. केवळ दीड हजार लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

Advertisement

दुसरा देश तुवालू (Tuvalu) आहे. WHO च्या अहवालानुसार, येथील शंभरपैकी पन्नास जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. हे बेट दक्षिण पॅसिफिकमध्ये समुद्रात आहे. येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक होती, त्यामुळे येथे एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. सुरुवातीपासूनच क्वारंटाईन आणि बॉर्डर पार करण्याबाबत कडक नियम करण्यात आले होते, परिणामी हा देश कोरोनामुक्त झाला आहे.

Advertisement

पॅसिफिक महासागरात वसलेले पिटकेर्न बेट (Pitcairn) हे प्रामुख्याने चार बेटांचा समूह आहे. पण इतर तीन बेटांऐवजी हे बेट कोरोनामुक्त राहू शकले. या बेटावर फक्त पन्नास लोक राहतात आणि तरीही हे सर्व लोक कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त आहेत.

Advertisement

दक्षिण अटलांटिक महासागरात स्थित सेंट हेलेना हे जगातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक मानले जाते. हे आफ्रिकेच्या दक्षिण पश्चिम किनार्‍यापासून 1200 मैल आणि राजधानी रिओपासून 250 मैलांवर आहे. येथील लोकसंख्या अवघी 4500 आहे पण हे सर्व लोक कोरोनापासून दूर आहेत. अहवालानुसार, येथे शंभरपैकी 58 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Loading...
Advertisement

नाउरू, ऑस्ट्रेलियाजवळ असलेला एक छोटासा देश. हा देश पांढर्‍या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय असले तरी, कोरोनामुळे या देशाने तातडीने बॉर्डर बंद केल्या होत्या. आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, येथे शंभरपैकी 68 लोकांना लसीकरण केले आहे. या देशाने अद्याप कोरोनाचा प्रसार होऊ दिलेला नाही.

Advertisement

पश्चिम पॅसिफिक समुद्रामध्ये असलेल्या मायक्रोनेशियाने (Micronesia) अद्याप कोरोनाला देशाबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. हा देश चार बेटांचा समूह आहे. या देशातही पर्यटकांची गर्दी होती, पण कोरोनाच्या सुरुवातीलाच त्याने आपल्या बॉर्डर बंद केल्या. परिणामी, आज WHO ने या देशाचा कोरोना मुक्त देशांच्या यादीत समावेश केला आहे.

Advertisement

Niue हा दक्षिण पॅसिफिकमध्ये स्थित एक लहान बेट देश आहे. तसेच कोरोनावर मात करण्यात यश आले आहे. WHO च्या अहवालानुसार, येथे 100 पैकी 79 लोकांना कोरोनाविरूद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

Advertisement

मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानने कोरोनाला आपल्या देशात येऊ दिलेले नाही. आतापर्यंत या देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशात लोकांची गर्दी होऊ दिली नाही. याशिवाय प्रत्येकाला मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले. लोक सुरुवातीपासूनच त्याचे अनुसरण करत आहेत, परिणामी हा देश कोरोनामुक्त झाला आहे.

Advertisement

Corona Update : कोरोनाबाबत मिळालाय महत्वाचा अपडेट.. पहा, मागील 24 तासांत किती सापडलेत नवे रुग्ण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply