Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

यु्क्रेन संकट राहणार कायम..! रशियाच्या नव्या वक्तव्याने वाढले टेन्शन; पहा, नेमके काय म्हटलेय रशियाने..

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी सांगितले की, फ्रान्स, जर्मनी आणि युक्रेन यांच्याशी सहमत असलेल्या 2015 च्या एका महत्त्वाच्या योजनेच्या मदतीने फुटीरतावादी संघर्ष सोडवणे शक्य होईल, असे वाटत नाही. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, पुतिन यांनी सुरक्षा परिषदेला सांगितले की, “आम्ही समजतो की आता 2015 च्या मिन्स्क शांतता कराराच्या अंमलबजावणीची कोणतीही शक्यता नाही.” युक्रेनियन सैन्य आणि रशियन-समर्थित बंडखोर यांच्यातील लढाई संपवण्यासाठी हा करार मान्य करण्यात आला होता.

Advertisement

2015 मिन्स्क शांतता करार ‘मिन्स्क 2’ म्हणूनही ओळखला जातो. हा दस्तऐवज 2015 मध्ये बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे तयार करण्यात आला होता. पूर्व युक्रेनच्या डॉनबास भागात 10 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी हा करार होता. हा प्रदेश 2014 मध्ये रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतला होता. युक्रेन सरकारने सांगितले, की डोनबास आणि क्रिमियन द्वीपकल्प रशियाच्या ताब्यात आहे. युक्रेन आणि पश्चिमी देशांनी रशियावर सैन्य आणि शस्त्रे देऊन फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला. रशियाने मात्र हे आरोप नाकारले आहेत.

Loading...
Advertisement

या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने रशिया, युक्रेन, फुटीरतावादी नेते आणि युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटनेच्या (OSCE) प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षरी केली. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या ठरावाद्वारे मिन्स्क 2 ला देखील समर्थन मिळाले. रशियन आक्रमणाच्या भीतीने रशिया समर्थक बंडखोरांविरुद्ध युक्रेनच्या बाजूने अल्बेनिया, कोसोवो आणि बोस्निया येथून सैनिक पाठवले जात असल्याच्या रशियाच्या दाव्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अल्बानिया, कोसोवो आणि बोस्नियाने हे दावे फेटाळले आहेत. अशा पद्धतीने येथे युद्धाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. या मुद्द्यावर अमेरिका आणि रशिया या देशांमध्येही तणाव वाढत आहे.

Advertisement

आधी चीन आता रशिया..! म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान निघालेत रशिया दौऱ्यावर; पहा, काय आहे पाकिस्तानचा प्लान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply