Corona Update : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ.. पहा, कोरोनाबाबत काय आहे अपडेट..
दिल्ली : जगभरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. अनेक देशात या घातक आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे या देशांतील परिस्थिती दिवसेंदिवस आधिकच खराब होत आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन आल्यानंतर, जगभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत जगभरात 42.13 कोटींहून अधिक लोक कोविड-19 च्या विळख्यात आले आहेत. तर कोट्यावधी लोक बरे सुद्धा झाले आहेत. त्याच वेळी, या आजारामुळे आतापर्यंत 58.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बातमी अशी आहे की, आतापर्यंत जगभरात 10.31 अब्ज लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले गेले आहे.
हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली आहे. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनीअरिंग (CSSE) ने एका नवीन अपडेटमध्ये सांगितले, की सध्याची जागतिक प्रकरणे 4,21,348,262 आहेत, तर मृत्यू संख्या 5,872,338 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण 10,317,284,055 लसीकरण करण्यात आले आहे. सीएसएसईच्या मते, अमेरिका हा जगातील सर्वाधिक 78,372,010 आणि 933,808 प्रकरणे आणि मृत्यूंसह सर्वात जास्त प्रभावित देश आहे. कोरोना प्रकरणांमध्ये भारत हा दुसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे. जिथे कोरोनाचे 42,780,235 रुग्ण आहेत तर 5,10,905 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर ब्राजीलमध्ये कोरोनाची 28,072,238 प्रकरणे आहेत तर 643,340 लोकांचा मृत्यू झाला आहे.
CSSE डेटानुसार, 5 दशलक्षाहून अधिक प्रकरणे असलेले इतर सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये फ्रान्स (22,310,014), ब्रिटेन (18,676,357), रशिया (14,802,439), तुर्की (13,266,265), जर्मनी (13,361,053), इटली (12,36,878), स्पेन (10,778,607) अर्जेंटिना (8,799,858), इराण (6,894,110), कोलंबिया (6,031,130) या देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मंदावला असेल मात्र, धोका अद्याप कायम आहे. अशा वेळी थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला अडचणीत आणू शकतो. वास्तविक WHO (World Health Orgnisation) ने देखील याबाबत इशारा दिला आहे. WHO ने पुन्हा सांगितले, की हा घातक आजार अजूनही कायम आहे. अजूनही जगभरात कोरोना संसर्गामुळे दर आठवड्याला सुमारे 75 हजार लोकांचा मृत्यू होत आहे.
वास्तविक, काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला होता. Omicron जगभरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. तथापि, या व्हेरिएंटचा प्रभाव आधीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी होता त्यामुळे तो जास्त धोकादायक ठरला नाही. अशा परिस्थितीत, संसर्ग जितक्या वेगाने वाढला, तितक्या वेगाने तो कमीही झाला. त्याच वेळी, WHO च्या या इशाऱ्यानुसार, ‘कोरोना संपला असे नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये अजूनही तब्बल 83 टक्के लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. Omicron प्रकार मंद झाला आहे, परंतु तो अद्याप कायम आहे.