Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचे थैमान..! दवाखाने भरले.. रस्त्यावरच सुरू आहेत रुग्णांवर उपचार; पहा, कुठे आलेत कोरोनाचे जुने दिवस

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. शनिवारी येथे 195 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जे एका दिवसाआधी आलेल्या 137 प्रकरणांपेक्षा जास्त आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे, की 94 कोविड-19 (Covid-19) प्रकरणे बाहेरून येणाऱ्या लोकांची आहेत. तर 101 प्रकरणे स्थानिक पातळीवरील आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 1,07,707 संसर्गाची प्रकरणे आली आहे आणि एकूण 4,636 मृत्यूची नोंद झाली आहे.

Advertisement

चीनशिवाय हाँगकाँगमध्येही (Hongkong) कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. इथेही चीनप्रमाणेच शून्य-कोविड धोरण अवलंबले गेले. असे म्हटले जात आहे, की हाँगकाँग सध्या या आजाराच्या सर्वात भीषण टप्प्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच अवस्था आज याठिकाणी आहे. येथील रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत. दवाखान्यात जागा नसल्याने नाईलाजाने रस्त्यावरच लोकांवर उपचार केले जात आहेत. कोविड-19 च्या चाचणी केंद्रांवरही मोठी गर्दी दिसून येत आहे. लोकांना तपासणी करण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते.

Advertisement

हाँगकाँगमधील वाढत्या प्रकरणांमुळे अधिकाऱ्यांनी आयसोलेशन युनिट्स आणि उपचार केंद्रांची संख्या वाढ करण्याची तयारी तीव्र केली आहे. शनिवारी येथे 6,063 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी हाँगकाँगमध्ये कठोर निर्बंध टाकण्यात आले होते. येथेही कोरोना नियंत्रणात होता, मात्र आता मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

Loading...
Advertisement

कॅनडामध्ये लोक अनिवार्य कोरोना लस आणि निर्बंधांना विरोध करत आहेत. लोकांना रस्त्यावरुन बाजूला करण्यासाठी पोलिसांनी अनेकांनी अटक केली आहे. काही आंदोलक अजूनही रस्ता सोडण्यास तयार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते बेकायदेशीरपणे रस्त्यावर बसले आहेत. मात्र जोपर्यंत सर्वांना हटवले जात नाही तोपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे. ब्रिटन कोरोना रुग्णांसाठी सेल्फ-आयसोलेशनची आवश्यकता दूर करण्याचा विचार करत आहे. पुढील आठवड्यापासून हे होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी मात्र या निर्णयाचा धोक्याचे म्हटले आहे.

Advertisement

कोरोनाचे टेन्शन होतेय कमी..! देशात मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply