Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘NATO’ ने केलाय धक्कादायक खुलासा..! युक्रेनसाठी रशिया तयार करतोय ‘असा’ प्लान; पहा, कसे वाढतेय संकट..

दिल्ली : रशियाने युक्रेनच्या सीमेवरून आपले सैन्य मागे घेत असल्याचे म्हटले असेल, परंतु अमेरिकेने त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही. नाटोच्या (NATO) एका अधिकाऱ्याने सांगितले की, कर्मचारी आता युक्रेनच्या राजधानीतून पश्चिमेकडील लिव्ह शहरात नेले जात आहेत. याशिवाय अधिकारी बेल्जियमलाही पाठवले जात आहेत. ते म्हणाले, की आमच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना अन्य सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.

Advertisement

इतर अनेक पाश्चात्य देशांनी आधीच त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेनची राजधानी कीवमधून दुसऱ्या शहरात पाठवले आहे. लिव या शहराच्या आजूबाजूला रशियन सैन्य नाही.  अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आणि जो बिडेन म्हणाले होते, की रशिया काही आठवड्यात युक्रेनला लक्ष्य करणार आहे आणि पहिले लक्ष्य कीव शहर असू शकते. युक्रेन नाटोचा सदस्य नाही आणि येथे कोणतेही सैन्य नाही. तथापि, 1990 पासून नाटोने कीवमध्ये त्यांची दोन कार्यालये सुरू केली आहेत. नाटो आणि युक्रेन सरकार यांच्यात संवाद साधता यावा आणि संरक्षण, सुरक्षेची काळजी घेता यावी म्हणून एक कार्यालय तयार करण्यात आले.

Advertisement

नाटो प्रमुख म्हणाले की, रशिया युक्रेनवर पूर्ण ताकदीने आक्रमण करण्याची योजना आखत असल्याचे सर्व संकेत दिसत आहेत. आम्ही सर्व सहमत आहोत की आक्रमणाची शक्यता खूप जास्त आहे. युक्रेनच्या रक्षणासाठी कोणतेही सैन्य तैनात केले जाणार नाही, असेही पहिल्या नाटो प्रमुखांनी याआधी सांगितले होते. मात्र, आता नाटोच्या सदस्य देशांनी आपले सैन्य युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले आहे. रशियाकडून हमला झाला तर त्यालाही उत्तर दिले जाईल, असेही नाटो प्रमुखांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युरोपीय देश युक्रेनवरील रशियाचे (UKraine-Russia Conflict) संकट अजूनही कायम आहे. रशिया मागे हटण्याच्या मनस्थितीत नाही. पाश्चात्य देश रशियाला सैन्य मागे घेण्यास सांगत आहेत. मात्र, रशिया कुणाचेच ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. तसेच अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांच्या कोणत्याही आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. तर दुसरीकडे, युक्रेनच्या बॉर्डरवर रशियन सैन्य अजूनही तळ ठोकून आहे, असा अमेरिकेचा दावा आहे.

Advertisement

शनिवारी, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते, की “आम्ही अमेरिका आणि नाटोला समजावून सांगू इच्छितो, की रशियाच्या हितसंबंधांचा पूर्ण आदर करण्याबद्दल नाटोच्या जबाबदाऱ्या जेव्हापासून अयशस्वी ठरल्या आहेत तेव्हापासून आम्ही त्यांच्या आश्वासनांवर असमाधानी आहोत.” रशियाच्या सुरक्षा मागण्यांकडे दुर्लक्ष करणे जगाच्या स्थैर्यासाठी चांगले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले.

Advertisement

.. म्हणून अमेरिका आणि नाटोवर रशिया भडकला..! स्पष्ट शब्दांत दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply