Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाबाबत WHO ने पुन्हा दिलाय गंभीर इशारा.. जगातील लोकांनाच केलेय ‘हे’ आवाहन; जाणून घ्या..

दिल्ली : देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मंदावला असेल मात्र, धोका अद्याप कायम आहे. अशा वेळी थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला अडचणीत आणू शकतो. वास्तविक WHO (World Health Orgnisation) ने देखील याबाबत इशारा दिला आहे. WHO ने पुन्हा सांगितले, की हा घातक आजार अजूनही कायम आहे. अजूनही जगभरात कोरोना संसर्गामुळे दर आठवड्याला सुमारे 75 हजार लोकांचा मृत्यू होत आहे.

Advertisement

वास्तविक, काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला होता. Omicron जगभरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. तथापि, या व्हेरिएंटचा प्रभाव आधीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी होता त्यामुळे तो जास्त धोकादायक ठरला नाही. अशा परिस्थितीत, संसर्ग जितक्या वेगाने वाढला, तितक्या वेगाने तो कमीही झाला. त्याच वेळी, WHO च्या या इशाऱ्यानुसार, ‘कोरोना संपला असे नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये अजूनही तब्बल 83 टक्के लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. Omicron प्रकार मंद झाला आहे, परंतु तो अद्याप संपलेला नाही.

Advertisement

संघटनेने सांगितले, की आम्हाला असे गृहीत धरावे लागेल की या नवीन प्रकार शोधणे खूप कठीण आहे. कारण त्याचा प्रसार जास्त आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण संपूर्ण जगात अजूनही दर आठवड्याला सुमारे 70 हजार लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होत आहे. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे, की 7 ते 13 फेब्रुवारी दरम्यान जगभरात 16 दशलक्षाहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 75 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Loading...
Advertisement

आरोग्य संघटनेने दिलेल्या या माहितीवरुन एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना व्हायरस अजूनही आहे. लोकांना संक्रमित करत आहे. तसेच जगात अनेक लोकांना अजूनही लस मिळालेली नाही. त्यामुळे धोका कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सतर्क राहणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Advertisement

Corona Update : कोरोनाबाबत WHO ने दिलीय महत्वाची माहिती; पहा, कोणत्या प्रश्नांची दिलीत उत्तरे..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply