Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून अमेरिका आणि नाटोवर रशिया भडकला..! स्पष्ट शब्दांत दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..

दिल्ली : युरोपीय देश युक्रेनवरील रशियाचे संकट अजूनही कायम आहे. रशिया मागे हटण्याच्या मनस्थितीत नाही. पाश्चात्य देश रशियाला सैन्य मागे घेण्यास सांगत आहेत. मात्र, रशिया कुणाचेच ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. तसेच अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांच्या कोणत्याही आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. तर दुसरीकडे, युक्रेनच्या बॉर्डरवर रशियन सैन्य अजूनही तळ ठोकून आहे, असा अमेरिकेचा दावा आहे.

Advertisement

शनिवारी, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही अमेरिका आणि नाटोला समजावून सांगू इच्छितो, की रशियाच्या हितसंबंधांचा पूर्ण आदर करण्याबद्दल नाटोच्या जबाबदाऱ्या जेव्हापासून अयशस्वी ठरल्या आहेत तेव्हापासून आम्ही त्यांच्या आश्वासनांवर असमाधानी आहोत.” रशियाच्या सुरक्षा मागण्यांकडे दुर्लक्ष करणे जगाच्या स्थैर्यासाठी चांगले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले.

Advertisement

रशियाच्या सुरक्षेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हे युरोप आणि इतरत्र स्थिरतेसाठी चांगले नाही, असे रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांना सांगितले आहे. समान आणि अविभाज्य सुरक्षेच्या तत्त्वाची खात्री करण्यासाठी सर्व देशांनी त्यांच्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्र्यांना दूरध्वनीद्वारे सांगितले. अशा परिस्थितीत, रशियाच्या कायदेशीर अधिकारांकडे दुर्लक्ष केल्याने केवळ युरोपातीलच नव्हे तर जगातील स्थिरतेवरही विपरित परिणाम होतो.

Loading...
Advertisement

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले, की अशा प्रकारे आश्वासने मोडणे हा पाश्चात्य नेत्यांचा बेजबाबदारपणा होता तर सोव्हिएत आणि रशियन नेत्यांनी त्यांची आश्वासने पाळली आणि आता ते विचारतात, की आम्ही तोंडी आश्वासने का स्वीकारत नाही. यावेळी फक्त कायदेशीर बंधनकारक हमी आहे आणि यापेक्षा काहीच कमी नाही, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

Advertisement

युक्रेन संकटात भारताच्या धोरणाचे रशियाने केलेय कौतुक; पहा, नेमके काय म्हटलेय मित्र रशियाने..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply