युक्रेनसाठी अमेरिकेचा आणखी एक निर्णय.. रशियाच्या विरोधात अमेरिकी सिनटने केलाय ‘हा’ ठराव..
मुंबई : युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या भीतीने (Ukriane-Russia Conflict) अमेरिकेच्या सिनेटने गुरुवारी रात्री एकमताने ठराव मंजूर केला. यामध्ये रशियाच्या संभाव्य आक्रमणा विरोधात स्वतंत्र आणि लोकशाहीवादी युक्रेनला पाठिंबा देण्याचे म्हटले आहे. ठरावात, सिनेटने (senate) युक्रेनची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा सहाय्य आणि राजकीय आणि राजनयिक सहाय्य प्रदान करण्याचे वचन दिले आहे. प्रादेशिक अखंडता मिळवण्यासाठी युक्रेन सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला जाईल, असेही त्यात म्हटले आहे. युक्रेनवर आक्रमण झाल्यास प्रतिबंधांचा निर्णय राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी घ्यावा, असेही या ठरावात म्हटले आहे.
रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकने दिलेल्या माहितीनुसार, ठरावात असे म्हटले आहे की, जर रशियाने युक्रेनवर हमला केला तर राष्ट्राध्यक्ष बिडेन रशिया विरोधात कठोर निर्णय घ्यावा. युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सिनेटने म्हटले आहे. या ठरावात रशियन फेडरेशनविरुद्ध युद्ध पुकारण्याबाबत किंवा लष्करी बळाचा वापर करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा स्पुतनिकने केला आहे. तसेच युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्याच्या प्रवेशास परवानगी देण्यासाठी अधिकृतता निर्माण करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.
दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव यांनी मंगळवारी सांगितले की, रशिया युक्रेनच्या सीमेवरून आपले काही सैन्य मागे घेत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याच्या कोणत्याही योजना सातत्याने नाकारल्या आहेत. रशियन सीमेजवळ नाटोच्या वाढत्या उपस्थितीमुळे स्वतःच्या सुरक्षेला धोका आहे, असा त्याचा आग्रह आहे. नाटोमध्ये (nato) युक्रेनचा समावेश करण्यास रशियाचा विरोध आहे, हे विशेष. हे थांबवण्यासाठी त्यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची तयारी केली आहे. अमेरिका आणि नाटो रशियाच्या विरोधात एकत्र येत आहेत आणि संभाव्य युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.