Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाने केलीय मोठी कारवाई.. अमेरिकाही देणार जशास तसे उत्तर; पहा, कशामुळे वाद वाढतोय..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावा दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी मोठा खुलासा केला आहे. येत्या काही दिवसांत रशिया युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, की सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर चर्चा करण्याची कोणतीही योजना नाही. दुसरीकडे, रशियाने देशातील अमेरिकन मिशनचे उपप्रमुख बार्ट गोरमन यांना देशाबाहेर काढले आहे. रशियाने त्यांना तातडीने देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. रशिया-युक्रेन तणावाच्या मुद्द्यावर रशिया त्यांच्या धोरणावर प्रचंड नाराज होता, असे मानले जाते. रशियाच्या या कारवाईला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

Advertisement

रशियाच्या या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढला आहे. रशियाच्या या कृत्यावर अमेरिकेने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे, की अमेरिका हा निर्णय योग्य नाही, असे मानते. कारण, त्यांच्या अधिकाऱ्याकडे रशियाचा तीन वर्षांचा व्हिसा होता. अमेरिकेच्या दूतावासाने असेही म्हटले आहे, की बार्ट गोरमनला रशियामध्ये तैनात करून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला नाही. रशियाच्या या कारवाईला सडेतोड उत्तर देऊ, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Loading...
Advertisement

रशिया-युक्रेन सीमेवर तणाव पाहता अमेरिका आणि रशिया दोन्ही देशांतील आपापल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे संभ्रमात आहेत. रशियाने डिसेंबरमध्ये म्हटले होते, की अमेरिकन दूतावासातील कर्मचारी ज्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ या पदावर काम केले आहे त्यांनी त्यांच्या मायदेशी परतावे. “आम्ही रशियाला अमेरिकन मुत्सद्दी आणि कर्मचार्‍यांच्या विरोधात निराधार कारवाई थांबवण्याचे आवाहन करतो, असे सांगितले. मात्र, रशियाला जे आवश्यक वाटत होते ते रशियाने केले आहे. अमेरिकेनेही संतप्त होत जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची ही धमकी जरी मानली तरी रशिया माघार घेईल, असे सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे आता अमेरिका काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

युद्धाचा धोका कायम..! रशियाने अमेरिका-युरोपला दिला ‘असा’ झटका; अमेरिकेचा संशयही खरा ठरला..

Advertisement
Advertisement

Leave a Reply