Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Hockey World Cup: भारत भिडणार तब्बल इतक्या संघाशी

मुंबई – १ जुलैपासून स्पेन (Spain) आणि नेदरलँड्समध्ये (Netherlands) होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघाला गट ब मध्ये ठेवण्यात आले आहे. भारताला इंग्लंड (England), न्यूझीलंड (Newzealand) आणि चीनच्या (China) बरोबरीने स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ नुकताच मस्कत येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळवून विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.

Advertisement

गेल्या विश्वचषकात भारतीय संघ प्रथमच अव्वल आठमध्ये होता. नेदरलँड्स जर्मनी, आयर्लंड आणि चिलीसह अ गटात आहेत, तर पूल सीमध्ये यजमान स्पेन, अर्जेंटिना, कोरिया आणि कॅनडा यांचा समावेश आहे. ड गटात ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जपान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

भारताची गोलकीपर सविता पुनिया म्हणाली की हा एक कठीण पूल आहे कारण जागतिक क्रमवारीत इंग्लंड (तिसर्‍या क्रमांकावर) आणि न्यूझीलंड (आठव्या क्रमांकावर) आपल्यापेक्षा वर आहेत आणि चीन कधीही काही ही करु शकतो.

Advertisement

सविता पुढे म्हणाली की संघ म्हणून आमचे लक्ष नेहमीच आमच्या कामगिरीवर असते, प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेवर नाही. आता पूल स्टेजमध्ये कोणाला खेळायचे हे आम्हाला माहीत असल्याने आम्ही त्यानुसार तयारी करू शकतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply