Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-अमेरिकेच्या वादात भारत कोणाच्या बाजूने..? ; पहा, अमेरिकेने ‘कसा’ आखलाय प्लान..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine Conflict) दरम्यान सुरू असलेल्या भांडणाच्या दरम्यान अमेरिकेने बुधवारी सांगितले की भारत नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी वचनबद्ध आहे. जर रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तर भारत अमेरिकेला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात नुकत्याच झालेल्या चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये (क्वाड) बैठकीत रशिया आणि युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.

Advertisement

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, की “या प्रकरणावर राजनयिक-शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज असल्याचे बैठकीत मान्य करण्यात आले.” क्वाड नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यास अनुकूल आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहित आहे की आमचा भारतीय भागीदार नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी वचनबद्ध आहे. या प्रणालीमध्ये अनेक नियम आहेत, त्यापैकी एक म्हणजे बळाच्या जोरावर बॉर्डर पुन्हा निर्धारीत केल्या जाऊ शकत नाहीत.

Advertisement

दुसरीकडे, व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी हमला केव्हाही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. “आम्ही त्या चौकटीत आहोत जिथे आम्हाला विश्वास आहे की हमला केव्हाही होऊ शकतो आणि त्याआधी रशियन बाजूने आक्रमण करण्यासाठी एक बनावट कारण वापरले जाईल,” असे साकी यांनी पत्रकारांना सांगितले.’

Loading...
Advertisement

भारत आणि इतर शेजारी राष्ट्रांविरुद्ध चीनच्या आक्रमक भूमिकेचा थेट संदर्भ देत ते म्हणाले, की “मोठे देश लहान देशांना त्रास देऊ शकत नाहीत.” देशाच्या लोकांना त्यांचे परराष्ट्र धोरण, त्यांचे भागीदार, सहकारी इत्यादी निवडण्याचा अधिकार आहे. ही तत्त्वे युरोपप्रमाणेच इंडो-पॅसिफिक प्रदेशातही तितकीच लागू आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.

Advertisement

याआधी परराष्ट्र मंत्री ब्लिंकन म्हणाले होते, की रशियाने निर्माण केलेल्या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी अमेरिका शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. “परंतु आम्ही म्हटल्याप्रमाणे ते प्रयत्न तेव्हाच प्रभावी होतील जेव्हा रशिया सैन्यांची संख्या कमी करण्यास तयार असेल,” असे परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.

Advertisement

.. म्हणून अमेरिका-युक्रेनला रशियावर विश्वास नाही; पहा, रशियाने कोणता दावा केला..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply