Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कोरोनानंतर पावसाने उडालाय हाहाकार..! पहा, कोणत्या देशात सुरू आहे पावसाचे थैमान..?

दिल्ली : जगभरात वायू प्रदूषणाच्या समस्येने अतिशय विक्राळ रुप धारण केले आहे. या संकटाने मानवी आरोग्यच धोक्यात आणले आहे. त्यानंतर आता हवामान बदलाचे भीषण संकट उभे राहिले आहे. कोरोना काळात अनेक देश या संकटाच्या तडाख्यात सापडले होते. कधी कडाक्याचा उन्हाळा तर कधी बेसुमार पाऊस आणि चक्रीवादळे आली. या नैसर्गिक संकटांनी अनेक देशांचे मोठे नुकसान केले. अजूनही नैसर्गिक संकटे थांबलेली नाहीत. आताही ब्राजील देशात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. या देशातील काही शहरांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

Advertisement

रियो दि जनेरियो प्रांतातील पेट्रोपोलिस शहरात मुसळधार पावसामुळे पूर आणि त्यानंतर जमीन खचल्यामुळे तब्बल 94 लोक दगावले आहेत. या आधी बुधवारी, मीडियाच्या वृत्तानुसार, पेट्रोपोलिस शहरात मुसळधार पाऊस आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे 71 लोकांचा मृत्यू झाला आणि किमान 54 घरे उद्ध्वस्त झाली. अहवालानुसार मृतांची संख्या 94 वर पोहोचली आहे.

Advertisement

ब्राजिलियन न्यूज पोर्टल G1 नुसार नागरी संरक्षण सेवेने 24 लोकांना सुरक्षित केले, तर 35 जण अद्याप बेपत्ता आहेत. ब्राजीलमध्ये मंगळवारी मुसळधार पावसानंतर हाहाकार उडाला आहे. ब्राजीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी पेट्रोपोलिस संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी मंत्र्यांना नियुक्त केले आहे. एका हिंदी वेबसाइटने याबाबत वृत्त दिले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, ब्राजील शेजारील अमेरिकेच्या सभोवतालच्या समुद्राची पातळी गेल्या 100 वर्षांपेक्षा पुढील 30 वर्षांत अधिक वाढेल. अमेरिकेची अंतराळ संस्था नासासह (NASA) अनेक एजन्सींच्या अहवालात असे म्हटले आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात अमेरिकेच्या समुद्र किनारी परिसरातील पाण्याची पातळी 2050 पर्यंत आजच्या तुलनेत 25-30 सेंटीमीटरने जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

हा अहवाल आधीच्या संशोधनास समर्थन देतो. समुद्राची पातळी चिंताजनक पातळीवर वाढत आहे आणि जगभरातील लोकांना धोका आहे. अहवालानुसार, समुद्राच्या पातळीत वाढ होईल. 2050 पर्यंत सरासरी 10 पट अधिक महापूर आणि त्यांची तीव्रता स्थानिक कारणांमुळे वाढू शकते. हा अहवाल 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचे अपडेशन आहे आणि प्रथमच, पुढील 30 वर्षांसाठी अंदाज देण्यात आला आहे. तथापि, या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक म्हणतात, की दीर्घकाळात बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी भयानक वाढ कदाचित सन 2100 आधी सुरू होणार नाही. अहवालानुसार, समुद्राची पातळी कितीतरी कमी किंवा जास्त असेल. याचे कारण म्हणजे बुडणारी जमीन, नाले आणि वितळलेले बर्फ यातून सोडले जाणारे पाणी आहे.

Advertisement

बाब्बो.. दिल्ली नाही तर हे शहर ठरलयं सर्वात प्रदूषित; पहा, कसे वाढलेय प्रदूषण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply