दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील तणावाने अचानक नवे वळण घेतले आहे. रशियाने बुधवारी सांगितले की, क्रिमियामध्ये लष्करी सरावानंतर आपले सैन्य माघारी निघाले आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि नाटो मात्र रशियाच्या प्रत्येक हालचालीकडे संशयाने पाहत आहेत. नाटोचे प्रमुख जनरल जेन्स स्टॉलेनबर्ग म्हणाले, की रशियाची लष्करी तैनाती वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले, की आम्ही सध्या रशियाच्या आश्वासनांवर आणि दाव्यांवर विश्वास ठेवू शकत नाही.
रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव बुधवारी जेव्हा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले तेव्हा आधिकच वाढला. क्रिमियामध्ये लष्करी सराव केल्यानंतर रशियन सैन्य बेस कॅम्पमध्ये परतत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यांची शस्त्रे आणि इतर उपकरणेही परत आणली जात आहेत. नाटो देशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. बिडेन म्हणाले की, अमेरिका संपूर्ण ताकदीने नाटोच्या हद्दीतील प्रत्येक इंच जमिनीचे रक्षण करेल. एका नाटो देशावर आक्रमण हे आपल्या सर्वांवरील आक्रमण आहे.
बिडेन म्हणाले, राष्ट्रांना सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा अधिकार आहे. मात्र, आम्ही मूलभूत तत्त्वांशी तडजोड करणार नाही. रशियाला अमेरिका, नाटो किंवा युक्रेनकडून धोका नाही. तुम्ही आमचे शत्रू नाही आहात आणि मला खात्री आहे की तुम्हाला युक्रेनविरुद्ध विनाशकारी युद्ध देखील नको आहे. तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी मंगळवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी हे संकट राजनैतिक पद्धतीने सोडवण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, की सचिव ब्लिंकन यांनी त्यांच्या रशियन समकक्षांना आमची काळजी व्यक्त केली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, युक्रेनचे परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाने सैन्य मागे घेण्याच्या घोषणेवर शंका व्यक्त केली आहे. “रशियाकडून सातत्याने विविध विधाने केली जात आहेत, त्यामुळे आमचा नियम आहे, की पहा आणि नंतर विश्वास ठेवा, जोपर्यंत सैनिक परत जाताना दिसत नाहीत तोपर्यंत आम्ही रशियाच्या कोणत्याही घोषणेवर आजिबात विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी सांगितले.
.. तरीही रशियाने युक्रेनला केलेय अगदीच बेजार; पहा, रशिया कसा देतोय या देशाला त्रास..?