Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. ‘तिथे’ कोरोना अजूनही आऊट ऑफ कंट्रोल.. पहा, WHO ने काय दिलाय गंभीर इशारा..?

मुंबई : जगात अजूनही कोरोनाचे थैमान सुरुच आहे. काही देशात कोरोना मंदावला आहे मात्र, काही देशात कोरोना अजूनही त्रास देत आहे. अमेरिका आणि युरोपीय देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Orgnisation) मंगळवारी सांगितले की, रशिया आणि युक्रेनसह पूर्व युरोपातील सहा देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे दुप्पट झाली आहेत. संस्थेचे आरोग्य अधिकारी या देशांकडे विशेष लक्ष देत आहेत.

Advertisement

डब्ल्यूएचओच्या युरोप क्षेत्राचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुगे यांनी सांगितले की, मध्य आशियापासून पूर्व सोव्हिएत युनियनपर्यंत विस्तारलेल्या पूर्व युरोपातील या प्रदेशात 53 देश आहेत. या देशांमध्ये आतापर्यंत 16.5 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. तसेच या घातक आजारामुळे 18 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 25,000 लोकांचा मृत्यू गेल्या आठवड्यात झाला आहे.

Advertisement

क्लुगे यांनी कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारात वाढ झाल्याबद्दल सांगितले. गेल्या दोन आठवड्यांत, कोविड-19 ची प्रकरणे या प्रदेशातील सहा देशांमध्ये (आर्मेनिया, अजरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, रशियन फेडरेशन आणि युक्रेन) दुपटीहून अधिक वाढली आहेत. Omicron व्हेरिएंट याआधीच्या कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कमी धोकादायक आहे आणि जगभरातील देशांमधील आरोग्य सेवांवर दबाव नाही. या परिस्थितीत त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणात वाढ करण्यावर भर देण्यास सांगितले. कारण, पूर्व युरोपमधील देशात लसीकरणाची (corona vaccination) परिस्थिती अत्यंत खराब आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोना हा घातक आजार जगात दाखल होऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. तरी देखील या आजाराचा धोका अजूनही कायम आहे. जगात अनेक ठिकाणी कोरोना थैमान घालत आहेत. आता तर कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत आहेत. ओमिक्रॉनने अनेक देशात हाहाकार उडाला आहे. मात्र, काही देशात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे हा आजार लवकर संपण्याचाही विचार समोर येत आहे. या मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी मत व्यक्त केले होते.

Loading...
Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत कोविड संबंधित महत्त्वाची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी कोरोनाची उत्पत्ती, तो कधी संपेल आणि काय खबरदारी घ्यावी लागेल अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. सन 2022 च्या अखेरीस आपण खूप चांगल्या स्थितीत राहू, असे त्यांनी सांगितले होते.

Advertisement

बाब्बो.. कोरोनाच्या संकटातही आयटी कंपन्यांनी केलीय बक्कळ कमाई; पहा, किती पैसे कमावलेत..?

Advertisement

कोरोनाने ‘त्या’ व्यापाऱ्यांनाही सोडले नाही.. पहा, नव्या वर्षात ‘कसा’ बसलाय जोरदार झटका..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply