Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर सगळ्या जगालाच भोगावे लागतील गंभीर परिणाम; पहा, कोणत्या संकटाचा बसू शकतो फटका..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा फटका संपूर्ण जगाला सहन करावा लागू शकतो. दोन्ही देशांमधील संघर्षाची शक्यता लक्षात घेता कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. युक्रेनवर रशियन आक्रमणाचा धोका लक्षात घेता, गेल्या सात वर्षांत किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे महागाईचा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, युक्रेनबरोबर युद्ध झाल्यास किंवा रशियावर अमेरिकेने निर्बंध टाकल्यास गॅस, खाद्य पदार्थांसह अनेक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढतील आणि परिणामी या संकटाचा युरोपसह संपूर्ण जगाला मोठा फटका बसेल. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे महागाईचे टेन्शन वाढले आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्या किमती वाढल्यामुळे, देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे.

Advertisement

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे $95 प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा महागाईचा दबाव वाढू शकतो. ब्रिटनमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ आहे आणि जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर ही किंमत प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे युद्ध झाल्यास इतर देशांना त्यांचे व्यापारी मार्ग बदलावे लागतील, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य युद्धाचा परिणाम गॅस बाजारावरही दिसून येत आहे. युरोपातील गॅस मार्केटला सर्वाधिक फटका बसला आहे. किमती वाढण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात गॅसच्या किमती 5 पटीने वाढल्या आहेत. जर युद्ध सुरू झाले तर, युरोपियन देशांना होणारा गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो आणि त्याचे कारण म्हणजे त्यातील एक तृतीयांश भाग युक्रेनमधून जातो. युद्ध झाल्यास लागू केलेल्या निर्बंधांमुळे व्यापार थांबू शकतो आणि अशा परिस्थितीत गॅसचा टंचाई निर्माण होते.

Loading...
Advertisement

युक्रेन एकेकाळी रशियन साम्राज्याचा भाग होता. त्यानंतर सोव्हिएत युनियन (USSR) ची स्थापना झाली, त्यानंतरही ते त्यात सामील राहिले, परंतु USSR च्या विघटनानंतर, युक्रेनने 1991 मध्ये स्वतःला स्वतंत्र देश घोषित केले. यानंतर त्यांनी रशियाऐवजी अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांशी संबंध दृढ केले. त्यामुळे संतप्त होऊन रशिया युक्रेनमधील बंडखोरीला सातत्याने पाठिंबा देत आहे.

Advertisement

रशिया युक्रेन परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने याआधीच युक्रेनचे एक शहर ‘क्रिमिया’ ताब्यात घेतले आहे. वास्तविक, अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र युक्रेनला त्यांच्या लष्करी आघाडीत नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) मध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत आहेत जेणेकरून त्याद्वारे रशियावर दबाव आणता येईल, परंतु रशियाने युक्रेनमध्ये नाटो सैन्याची उपस्थिती आणि लष्करी सराव यांना जोरदार विरोध केला आहे.

Advertisement

G7 देश रशियाच्या विरोधात..! श्रीमंत देशांनी रशियाला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; रशियाचे होईल मोठे नुकसान

Advertisement
Advertisement

Leave a Reply