Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘तो’ धोका टाळण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांचा नवा प्लान; रशियालाही दिलाय महत्वाचा संदेश

दिल्ली : युक्रेनवर रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधला सुरू असलेला संघर्ष संपताना दिसत नाही. तथापि, युक्रेनवर संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशियाच्या मुत्सद्द्याने सोमवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सुरक्षा मागण्यांच्या मुद्द्यावर पाश्चात्य देशांबरोबर चर्चा सुरू ठेवण्यास सांगितले आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एपीने दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही अशा वेळी रशियन मुत्सद्द्याने हा उपदेश दिला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Advertisement

परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले, की अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या सुरक्षा मागण्या नाकारल्या असल्या तरीही आपण अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांबरोबर वाटाघाटी सुरू ठेवल्या पाहिजेत. ते म्हणाले की, अमेरिकेने आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची ऑफर दिली आहे. यावर पुतिन यांनी विचारले, की पाश्चात्य देशांसोबत राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवणे शहाणपणाचे आहे का, लावरोव्ह यांनी उत्तर दिले की चर्चेची शक्यता अद्याप संपलेली नाही.

Advertisement

रशिया आणि पाश्चात्य देशांमधील संघर्ष टाळण्यासाठी जर्मन चान्सलर प्रयत्न करत असताना रशियामधील ही महत्वाची बैठक आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जर्मन चान्सलर ओलाफ शाल्झ सोमवारी युक्रेनमध्ये पोहोचले. यानंतर ते मॉस्कोला जाण्याचा विचार करत आहे. जर्मनीचे चांसलर ओलाफ शाल्झ हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. अहवालात म्हटले आहे, की ते रशियाचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील.

Loading...
Advertisement

त्याचवेळी, रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील चर्चेचा मार्ग अद्याप बंद झालेला नाही. तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरे तर रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाख ३० हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. याबाबत पाश्चात्य देश सतर्क झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या वतीने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनाही मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

Advertisement

आता अमेरिका आणि जर्मनीने रशियाला धमकावले.. ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देश रशियाच्या विरोधात

Advertisement
Advertisement

Leave a Reply