मुंबई : कोरोना हा घातक आजार जगात दाखल होऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. तरी देखील या आजाराचा धोका अजूनही कायम आहे. जगात अनेक ठिकाणी कोरोना थैमान घालत आहेत. आता तर कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत आहेत. ओमिक्रॉनने अनेक देशात हाहाकार उडाला आहे. मात्र, काही देशात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे हा आजार लवकर संपण्याचाही विचार समोर येत आहे. या मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत कोविड संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाची उत्पत्ती, तो कधी संपेल आणि काय खबरदारी घ्यावी लागेल अशा अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी असे सांगितले, की 2022 च्या अखेरीस आपण खूप चांगल्या स्थितीत राहू.
लाइव्हमिंटच्या रिपोर्टनुसार, सौम्या स्वामीनाथन यांना मुलाखती दरम्यान जेव्हा त्याला विचारण्यात आले की कोरोना व्हायरस नेमका कुठून आला, यावर त्यांनी सांगितले, की सर्व नवीन विषाणू जुनोटिक आहेत. याचा अर्थ असा होतो, की ते प्राण्यांपासून मानवांमध्ये गेले आहे. यामध्ये एचआयव्ही, झिका व्हायरस, इबोला, एसएआर, एमईआर आणि दोन कोरोना विषाणूंचा समावेश आहे. कोरोना विषाणूचे अनुवांशिक अनुक्रम पाहता, असे म्हणता येईल की तो वटवाघळांपासून आला असावा. मात्र, ते प्राण्यांपासून माणसात कुठे, कसे आणि केव्हा गेले हे कळू शकले नाही. भविष्यात हा आजार टाळण्यासाठी त्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हा घातक विषाणू चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून जगभरात पसरल्याचेही सांगण्यात येत आहे. बहुतांश देश आणि शास्त्रज्ञांनाही तसे वाटत आहे. त्यामुळे हा सिद्धांतही नाकारला गेलेला नाही.
कोरोना साथरोग कधी संपेल या मुद्द्यावर स्वामीनाथन म्हणाल्या, की मला वाटत नाही की कोणीही याचा अंदाज व्यक्त करू शकेल. कोरोना साथरोग संपल्याची घोषणा करू नये. सावधगिरी न बाळगणे योग्य नाही. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आपणास सुरुच ठेवावे लागणार आहे. असे वाटते की आपण 2022 च्या अखेरीस आधिक चांगल्या परिस्थितीत राहू. असे असले तरी सतर्क राहणे जास्त महत्वाचे आहे.
Corona Update : कोरोनाचे टेन्शन कमी होतेय..! पहा, 24 तासात किती सापडलेत नवे कोरोना रुग्ण ?