Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ संकटाचा धसका..! विमान उड्डाणे बंद.. कार्यालयांनाही टाळे; पहा, कुठे घडतोय हा धक्कादायक प्रकार..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव कायम आहे. युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले दोन्ही देश सतत आमनेसामने येताना दिसतात. अमेरिका देखील युद्धाच्या शक्यतेबद्दल सतत भाषणबाजी करत आहे. दरम्यान, अनेक देशांनी युक्रेनमधून आपल्या दूतावासातील कर्मचारी काढून घेतले आहेत. जपाननेही आपल्या दूतावासातील कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना माघार घेण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

जपानच्या दूतावासाने म्हटले आहे, की त्यांचे बहुतेक कर्मचारी युक्रेन सोडून गेले आहेत. जपानने तेथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी मायदेशी परतण्यास सांगितले आहे. याआधी, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले, की युक्रेनमधील आपल्या दूतावासाचे कामकाज बंद केले आहे. सध्या ऑस्ट्रेलियाने आपल्या मुत्सद्यांची येथील तात्पुरत्या कार्यालयात बदली केली आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने आधीच कीवमधील आपला दूतावास कायमचा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही युक्रेनमधील दूतावास निलंबित केला होता. कॅनडाने युद्धाचा धोका लक्षात घेऊन तात्पुरते कार्यालय सुरू करण्यास सांगितले आहे. अमेरिकेने युक्रेनमधून आपल्या दूतावासातील बहुतेक कर्मचारी आणि नागरिकांना माघार येण्यास सांगितले आहे.

Advertisement

अमेरिका आपल्या नागरिकांना वारंवार आवाहन करत आहे, की त्यांनी युक्रेनमधून परत यावे. अमेरिकेने युक्रेनची राजधानी कीव येथून आपल्या काही कर्मचाऱ्यांची लवीव शहरात बदली केली आहे. दरम्यान, रशिया युक्रेनवर कधीही आक्रमण करू शकतो, असेही ब्रिटनने म्हटले आहे. त्याचवेळी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे रशियाचे म्हणणे आहे. मात्र, युक्रेनला सर्व बाजूंनी रशियाने वेढले आहे. त्याचे सैनिक बेलारूस, क्रिमियासह जॉर्जियामध्ये तैनात आहेत.

Loading...
Advertisement

रशियानेही युक्रेनच्या सीमेवर आपली अवजड शस्त्रे आणि S-400 क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. युक्रेनवर हमला केल्यास त्याचे परिणाम रशियाला भोगावे लागतील, असा कडक इशारा अमेरिकेने रशियाला दिला आहे. या संकटाच्या काळात अनेक पाश्चात्य देशांनी युक्रेनला जाणारी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत किंवा बदलली आहेत. युक्रेनने आपल्या विमान कंपन्यांना बेलारूसला जाण्यास मनाई केली आहे. रशियामध्ये आधीच लष्करी सराव सुरू आहेत.

Advertisement

आता ब्रिटेनही मैदानात..! रशियाच्या विरोधात ‘या’ देशाला करणार मदत; पहा, काय रशियाला घेरण्याचा प्लान..?

Advertisement

अमेरिका की रशिया..! ‘त्या’ संकटात पाकिस्तान कुणाच्या गटात..? पहा, काय उत्तर दिलेय पाकिस्तानने..

Advertisement
Advertisement

Leave a Reply