Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ब्रिटेनही मैदानात..! रशियाच्या विरोधात ‘या’ देशाला करणार मदत; पहा, काय रशियाला घेरण्याचा प्लान..?

दिल्ली: ब्रिटन युक्रेनला लष्करी मदत आणि आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची तयारी करत आहे. या देशावर रशियाच्या आक्रमणाचा वाढता धोका पाहता आता ब्रिटेनही मदतीसाठी पुढे आला आहे. ब्रिटिश सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन या आठवड्याच्या अखेरीस रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी आणि युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी युरोपला भेट देणार आहेत.

Advertisement

मात्र जॉन्सन कोणत्या देशात जाणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांना नॉर्डिक आणि बाल्टिक देशांशी अधिक जोडून घ्यायचे आहे, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. प्रवक्त्याने सांगितले की, ‘युक्रेन सीमेवरील संकट आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीवरून रशिया युक्रेनवर कोणत्याही दिवशी आक्रमण करण्याची योजना आखत आहे.

Advertisement

अमेरिका आणि ब्रिटनचे म्हणणे आहे, की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 20 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक संपण्याआधी कधीही युक्रेनवर कब्जा करण्याचे आदेश देऊ शकतात. हे युरोपमधील अनेक दशकांतील सर्वात मोठे सुरक्षा संकट असेल. रशियाने युक्रेनच्या सीमेवर 1 लाखांपेक्षा जास्त सैन्य तैनात केले आहे आणि देशावरील आक्रमणाचे वृत्त मात्र नाकारले आहे.

Loading...
Advertisement

रशियाचे म्हणणे आहे की, पाश्चात्य देश स्वतःच्या चिथावणीखोर कारवाया लपवण्यासाठी खोटे आरोप करत आहेत. त्याच वेळी, ब्रिटीश सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले, की जॉन्सन युक्रेनला मदत करण्यासाठी सहकारी देशांसोबत काम करत आहे. याबाबत येत्या काही दिवसांत घोषणा केली जाईल. ब्रिटेन युक्रेनला रणगाडाविरोधी शस्त्रे आणि प्रशिक्षण कर्मचारी देत आहे.

Advertisement

पंतप्रधान बोरिस जॉन्सन स्वतः देशांतर्गत राजकीय संकटात अडकले असताना ब्रिटेन युक्रेनला पाठिंबा देत आहे. पोलीस त्यांच्या ऑफिस आणि निवासस्थानी लॉकडाऊन पार्टी प्रकरणाचा तपास करत आहेत. इतकेच नाही तर पोलीस चौकशी जॉन्सन यांचीही चौकशी करत आहेत. लॉकडाऊन नियमांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांमुळे जॉन्सन यांचे अधिकार कमी केले आहे आणि त्यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या काही खासदारांनी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

Advertisement

फ्रान्सनंतर ब्रिटेनला रशियाने दिला झटका..! ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देशांत जोरदार वाद; पहा, नेमके काय घडलेय ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply