अमेरिका की रशिया..! ‘त्या’ संकटात पाकिस्तान कुणाच्या गटात..? पहा, काय उत्तर दिलेय पाकिस्तानने..

दिल्ली : युक्रेन संकटावरून रशिया आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले, की त्यांचे सरकार कोणाच्या पाठीशी आहे. इम्रान खान यांनी रविवारी सांगितले, की त्यांचा देश जागतिक राजकारणातील कोणत्याही गटात सामील होणार नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे सर्व देशांबरोबर सलोख्याचे संबंध असणे, हे त्यांचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावरुन हे स्पष्ट होत आहे, की युक्रेन संकटात पाकिस्तान कोणत्याही देशाच्या गटात सहभागी होणार नाही. असे असले तरी पाकिस्तानचा स्वभाव पाहता पाकिस्तान या धोरणावर किती ठाम राहिल, हे सांगता येणे अशक्य आहे.
खान यांनी सांगितले की, “आम्ही एखाद्या विशिष्ट गटात आहोत असे वाटेल अशा परिस्थितीत आम्हाला प्रवेश करायचा नाही.” इतर कोणत्याही देशापेक्षा पाकिस्तानवर चीनचा जास्त प्रभाव आहे, ही धारणाही खान यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, ‘प्रत्येक देशाबरोबर संबंध राखणे’ हे देशाचे धोरण आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालयही या देशाचे धोरण स्पष्ट करते. देशाच्या स्वातंत्र्याच्या 74 वर्षांपैकी अर्धा काळ पाकिस्तानच्या सैन्याने राज्य केले. पंतप्रधान खान यांनी शीतयुद्धाच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीनचे अनुसरण करणार नसल्याचे सांगण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी अनेक वेळा या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला खान म्हणाले होते, की अमेरिका आणि चीनला एकत्र आणण्यासाठी पाकिस्तान आपली धोरण घेऊ इच्छितो कारण “दुसरे शीतयुद्ध” कोणालाच फायदा देणार नाही. त्यामुळे त्या दिशेने प्रयत्न करण्यास पाकिस्तान तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हे सांगितले असले तरी हा त्यांच्या आंतराराष्ट्रीय राजकारणाचा भाग असू शकतो. कारण, चीनच्या मैत्रीमुळे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात तणाव जास्त वाढला आहे. अमेरिकेने आता पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानी नेते सुद्धा आता अमेरिकेवर जोरदार टीका करत असतात. तर दुसरीकडे रशिया आणि पाकिस्तान यांच्यातही सहकार्य वाढत आहे. पुढील महिन्यात पंतप्रधान खान रशिया दौऱ्यावर जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. रशिया सुद्धा पाकिस्तानमधील प्रकल्पात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहे. या घडामोडी पाहता पाकिस्तान आपल्या धोरणावर कायम राहिल का, हा मोठा प्रश्न आहे.
अर्र.. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच मान्य केलेय ‘ते’ अपयश.. पहा, पाकिस्तान कुठे ठरलाय अपयशी..?