Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: दिग्गजांना मात देत सिंगापूरच्या ‘हा’ ऑलराउंडर मेगा लिलावामध्ये झाला मालामाल

मुंबई – IPL 2022 च्या मेगा लिलावाची ( Mega Auction) उत्सुकता कायम आहे. सर्व संघ आपापल्या आवडत्या खेळाडूंना आपल्या संघात सामावून घेण्यासाठी एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. सध्या सुरू असलेल्या लिलावात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने मोठा दाव लावत सिंगापूरचा (Singapore) 25 वर्षीय अष्टपैलू टीम डेव्हिडचा (Tim David) समावेश केला आहे. फ्रँचायझीने या खेळाडूसाठी 8.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. डेव्हिडच्या संघात समावेश झाल्यानंतर संघाला हार्दिक पांड्याचा वारसदार सापडण्याची आशा क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Advertisement

आयपीएल लिलावापूर्वी मुंबई संघाने आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केलेल्या चार खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याचे नाव नव्हते. त्याच वेळी, तो लिलावात येण्यापूर्वीच, गुजरात टायटन्सच्या नवीन संघाने त्याला मोठ्या रकमेसह कर्णधार म्हणून आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. पंड्याच्या जागी संघाला अशाच एका दमदार अष्टपैलू खेळाडूची गरज होती, जी फ्रँचायझीने डेव्हिडसोबत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...
Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

टीम डेव्हिडच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 14 टी-20 सामने खेळताना 14 डावात 46.5 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत. डेव्हिडच्या बॅटने चार अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय, त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply