Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तरीही अमेरिकेने दिलाय भारताला पाठिंबा; चीनचे टेन्शन वाढणारच; पहा, काय म्हटलेय अमेरिकेच्या अहवालात ?

दिल्ली : इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजिक रिपोर्ट जारी करताना अमेरिकेने म्हटले आहे, की भारत सध्या भू-राजकीय आव्हानांचा सामना करत आहे. विशेषत: चीन आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील त्याच्या आक्रमकतेचा सामना करत आहे. बायडेन प्रशासनाने शुक्रवारी अहवाल प्रसिद्ध केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेस आधिक बळकट करणे, या प्रदेशाचे सक्षमीकरण करणे आणि भारताच्या उदयाला आणि या प्रक्रियेत प्रादेशिक नेतृत्वाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनाबाबत माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

अमेरिकेचे हे वक्तव्य भारतासाठी उपयुक्त आहे तर चीनच्या टेन्शनमध्ये वाढ करणारे आहे. कारण, S-400 क्षेपणास्त्रानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांनी उघडपणे भारताचे समर्थन केले आहे. यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत द्विपक्षीय संबंध दिसून येतात.

Advertisement

अमेरिकेने म्हटले आहे की, “आम्ही धोरणात्मक भागीदारी तयार करणे सुरू ठेवू ज्यामध्ये अमेरिका आणि भारत एकत्रितपणे आणि प्रादेशिक गटांद्वारे दक्षिण आशियामध्ये स्थिरता वाढ करण्यासाठी कामकाज करतात.” आरोग्य, अंतराळ आणि सायबरस्पेस यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढ, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य मजबूत करणे महत्वाचे राहणार आहे. आमचा विश्वास आहे, की भारत दक्षिण आशिया आणि हिंदी महासागरात समविचारी भागीदार आणि नेतृत्वकर्ता देश आहे. तथापि, एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारताला खूप महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

Loading...
Advertisement

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या वर्तनाचा भारतावर परिणाम झाला आहे. मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांनी बॉर्डरवर सैन्याच्या तैनातीत वाढ केली आहे. अहवालात म्हटले आहे की, अमेरिका प्रमुख प्रादेशिक भागीदार भारत, इंडोनेशिया, मलेशिया, मंगोलिया, सिंगापूर, तैवान, व्हिएतनाम आणि पॅसिफिक बेटांबरोबर संबंध सुधारण्यावर भर देईल. त्यानुसार, ‘आम्हाला चीनला बदलायचा नाही, तर आम्हाला अमेरिका आणि त्याच्या भागीदारांशी धोरणात्मक वातावरण तयार करायचे आहे’.

Advertisement

चीनमुळे ‘या’ देशाला बसणार 50 कोटी डॉलरचा फटका; अमेरिकेने 28 फेब्रुवारीपर्यंत दिलीय मुदत

Advertisement
Advertisement

Leave a Reply