Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून अमेरिकेला तिथे सुरू करायचेय युद्ध..! पहा, कुणी उघड केलाय अमेरिकेचा खतरनाक प्लान

दिल्ली : युक्रेन संकटावर युरोपमध्ये तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातही तणाव वाढत आहे. त्याचवेळी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेला कोणत्याही किंमतीवर युद्ध हवे आहे. वास्तविक, अमेरिकेने विमानातून हजारो अतिरिक्त सैनिक युरोपिय देशात धाडल्यानंतर रशियाने हे वक्तव्य केले आहे. युक्रेन-रशिया दरम्यान निर्माण झालेली परिस्थिती पाहता रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करू शकतो, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Advertisement

युक्रेनच्या संकटाच्या दरम्यान अमेरिका पूर्व युरोपमध्ये 3,000 अतिरिक्त सैन्य पाठवत आहेत. अधिकृत घोषणेआधी पत्रकारांशी बोलताना एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्याच्या सुरूवातीस हे सैनिक आधीच्या 1700 अमेरिकन सैन्यात सामील होतील. अमेरिका आणि पाश्चात्य देश युक्रेनला लागून असलेल्या देशांमध्ये त्यांच्या सैन्याची तैनातीत वाढ करत आहेत. याशिवाय युक्रेनलाही शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात आहे. रशियानेही युक्रेनच्या सीमेवर शस्त्रास्त्रांची तैनातीत वाढ केली आहे.

Advertisement

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेची अनावश्यक भीती आधीपेक्षा जास्त दिसून येत आहे. अमेरिकेला युद्ध हवे आहे. ते सुद्धा कोणत्याही किंमतीत. ते म्हणाले की, चिथावणी देणे, प्रचार करणे आणि धमकावणे हा अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्राधान्याचा मार्ग आहे. सैन्यवाद आणि साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा कशा उघड होतात याकडे संपूर्ण जग पाहत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पाश्चिमात्य देशांनी रशियावर युक्रेनवर आक्रमण करण्याची योजना आखत असल्याचा आरोप केला आहे.

Loading...
Advertisement

रशिया युक्रेनवर कधीही हमला करू शकतो, असे अमेरिकेने म्हटले आहे. यामुळे त्यांनी कीवमधील आपला दूतावास रिकामा करण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले, की परराष्ट्र विभाग लवकरच घोषणा करेल की कीव दूतावासातील सर्व अमेरिकन कर्मचाऱ्यांना रशियन आक्रमणाच्या भीतीमुळे देश अगोदरच सोडणे आवश्यक आहे. मंत्रालयाने याआधी युक्रेनमधील अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. याशिवाय अत्यावश्यक नसलेल्या कर्मचार्‍यांना तेथून जायचे की नाही, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

फ्रान्सनंतर ब्रिटेनला रशियाने दिला झटका..! ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देशांत जोरदार वाद; पहा, नेमके काय घडलेय ?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply