Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता फ्रान्समध्येही ज्याची भीती होते तेच घडले..! पहा, लोक ‘का’ संतापलेत सरकारवर..?

दिल्ली : कॅनडामध्ये ज्या प्रमाणे मोठे निदर्शने झाला तशाच प्रकारचे आंदोलन आता फ्रान्समध्येही सुरू झाले आहे. आंदोलन होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. कठोर निर्बंध टाकले मात्र, त्याचा फार फायदा झाला नाही. आता लोकांनी वैक्सीन पासच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राजधानी पॅरीस शहरास घेरण्यासाठी अनेक ट्रक दक्षिण फ्रान्सकडे रवाना झाले आहेत. तसेच या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लोक कार, दुचाकी घेऊन निघाले आहेत.

Advertisement

फ्रान्स सरकारने हॉटेल, थिएटर यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी वैक्सीन पास बंधनकारक केला होता. आंदोलक मात्र या पासचा विरोध करत आहेत. सर्वात आधी लोकांनी सोशल मिडियावर याचा विरोध केला होता. त्यानंतर हा विरोध वाढत गेला. त्यामुळे सरकार आता बॅकफूटवर गेले आहे. सरकारी प्रवक्त्याने सांगितले, की परिस्थिती सामान्य झाल्यानंतर वैक्सिन पास बंधनकारक असण्याचा निर्णय रद्द करण्यात येईल.

Advertisement

याआधी कॅनडामध्ये वैक्सीन विरोधात आंदोलन झाले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनामुळे ओटावा शहर पुर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे असे आंदोलन फ्रान्समध्ये होण्याचा धोका निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. शहर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले होते की, “प्रमुख रस्त्यांवर जाम टाळण्यासाठी, तिकिटे जारी करण्यासाठी आणि या विरोध प्रतिबंधांचे उल्लंघन करणार्‍यांना अटक करण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

Loading...
Advertisement

रस्ता अडवणाऱ्यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, त्याला 4,500 युरो (सुमारे 3,85,609 रुपये) आणि तीन वर्षांची ड्रायव्हिंग बंदी देखील ठोठावण्यात येणार आहे. बुधवारी फ्रान्सच्या आजूबाजूला कार, व्हॅन आणि मोटारसायकलचे अनेक काफिले दिसल्यानंतर पॅरिस पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. या वाहनांसह, लोक फ्रान्सच्या राजधानीत जमा होण्यास तयार आहेत. हे लोक कॅनडातील प्रदर्शनांनी प्रेरित आहेत. खरे तर, कॅनडामधील ट्रक चालकांना अमेरिकेची बॉर्डर पार करण्यासाठी कोविड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे त्यांनी ओटावा येथे निदर्शने केली.

Advertisement

फ्रान्समधील इतर शहरांतील लोक राजधानीच्या शहरात येण्याची शक्यता आहे. पॅरिस प्रांताने सांगितले की, सार्वजनिक अव्यवस्था होण्याचा धोका दर्शवून आंदोलकांना 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत राजधानीत प्रवेश करण्यास बंदी घातली जाईल. दक्षिणेकडील फ्रेंच शहर बायोने येथे अशा प्रदर्शनात भाग घेतलेल्या एहांडे अबेरी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले, की सामान्य जीवनातील घडामोडींसाठी वैक्सीन पास अनिवार्य करण्याचा सरकारचा निर्णय योग्य नव्हता.

Advertisement

फ्रान्सनंतर ब्रिटेनला रशियाने दिला झटका..! ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देशांत जोरदार वाद; पहा, नेमके काय घडलेय ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply