Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनी तंत्रज्ञानाचा कारनामा..! फक्त एकाच सेकंदात केलाय ‘हा’ मोठा चमत्कार; जाणून घ्या, काय आहे संशोधकांचा दावा..

दिल्ली : जगभरात 5G तंत्रज्ञानावर वेगाने काम केले जात आहे. तर चीनने त्याही पुढे पाऊल पुढे टाकत 6G वर काम सुरू केले आहे. त्याचवेळी 6G तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या चिनी संशोधकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा स्ट्रीमिंग स्पीडमध्ये नवा विक्रम केला आहे. यामुळे चीनला वायरलेस कम्युनिकेशनच्या पुढील पिढीसाठी स्पर्धात्मक फायदा मिळू शकेल. संशोधकांनी व्होर्टेक्स मिलीमीटर तरंगांचा वापर करून फक्त एका सेकंदात एक टेराबाइट डेटा एका किलोमीटरपर्यंत पाठवला.

Advertisement

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात म्हटले आहे, की व्होर्टेक्स मिलिमीटर लहरी हा उच्च-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींचा एक प्रकार आहे, जो वेगाने फिरतो. सिंघुआ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंगमधील प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील टीमने 9 फेब्रुवारी रोजी एका निवेदनात म्हटले आहे, की बीजिंग हिवाळी ऑलिंपिक कंपाऊंडमध्ये गेल्या महिन्यात स्थापित केलेली प्रायोगिक वायरलेस कम्युनिकेशन लाइन एकाच वेळी 10,000 उपकरणांशी कनेक्ट होऊ शकते.

Advertisement

टीमने असा दावाही केला आहे, की हायपरसोनिक शस्त्र 6G तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्य शोधू शकते आणि कम्युनिकेट करू शकते. ध्वनीच्या वेगाच्या पाचपट पेक्षा जास्त वेग असलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना नेटवर्कमुळे काही वेळा ब्लॅकआउटचा सामना करावा लागतो असे बहुतेक वेळा दिसून येते. चीनने अनेक प्रसंगी सांगितले आहे, की ते भविष्यातील 6G तंत्रज्ञान युद्धपातळीवर वापरत आहेत.

Loading...
Advertisement

चिनी संशोधकांनी दावा केला आहे, की या प्रयोगातून असे दिसून आले आहे की चीन 6G साठी संभाव्य महत्त्वाच्या तंत्रज्ञानावरील संशोधनात जगात आघाडीवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, चीनी शास्त्रज्ञांनी घोषित केले की त्यांनी 6G तंत्रज्ञान विकसित केले आहे जे 5G पेक्षा किमान 100 पट वेगवान आहे.

Advertisement

चीनी तंत्रज्ञानाचा आणखी एक कारनामा..! तयार केलाय ‘अजब’ रोबोट; चीनसाठी फायदा तर दुसऱ्या देशांना देणार ‘टेन्शन’

Advertisement
Advertisement

Leave a Reply