कोरोनाचा धोका अजूनही आहे..! WHO ने लोकांना दिलाय ‘हा’ महत्वाचा इशारा; वाचा, महत्वाची माहिती..
मुंबई : कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, हा घातक आजार आता कमी झाला आहे. काही जणांना वाटते की आता कोरोना लवकरच संपणार आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मात्र याबाबत एक इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, की ‘काही लोक वारंवार घोषणा करत आहेत की कोरोना आजार आता संपला आहे. मात्र हे बरोबर नाही.
यावेळी आजार संपला असे कोणीही म्हणू शकत नाही. ते कधी संपेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना संपला आहे असे म्हणून किंवा अशा गोष्टींवर विश्वास ठेऊन सावधगिरी बाळगणे सोडून देणे आजिबात योग्य ठरणार नाही. कोरोनाचा एक नवीन प्रकार कुठेही, केव्हाही उद्भवू शकतो, त्यामुळे अजूनही अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
जगात कोरोनाचे जेमतेम 100 रुग्ण असताना WHO ने इशारा दिला होता. मात्र त्यानंतर हा इशारा कोणीही गांभीर्याने घेतला नाही. मौल्यवान वेळ वाया गेला. यानंतर अमेरिका आणि युरोपमध्ये कशा प्रकारचा विध्वंस झाला ते साऱ्या जगाने पाहिले. आफ्रिकन देशांतील 85 टक्के लोकसंख्येला अजूनही कोरोना लसीचा पहिला डोस मिळालेला नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ही परिस्थिती कोरोनाचे नवीन व्हेरिएंट निर्माण आणि पसरण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञाने सांगितले की, आपल्याला दीर्घकाळ कोरोनाशी संबंधित खबरदारीचे पालन करावे लागेल. स्वामीनाथन म्हणाले, ‘सध्या नाही, पण 2022 पर्यंत आपण अधिक चांगल्या परिस्थितीत राहू. त्यावेळी हा व्हायरस आता कोणत्या स्थितीत आहे आणि तो कधी संपू शकतो हे आपणास चांगल्या प्रकारे सांगता येईल. ‘सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहे. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना विषाणू जगभरात पसरल्याचा सिद्धांतही पूर्णपणे नाकारला गेला नाही. व्हायरस नेमका कुठून आला, याचे उत्तर शोधण्यास फार काळ लागतो. त्यामुळे व्हायरसचा ठावठिकाणा इतक्या लवकर आणि सहजासहजी समजू शकत नाही.
कोरोनाने झटका दिलाच तर..! देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान किती..? पहा, सरकारने काय दिलेय उत्तर..