Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाचा धोका वाढला..! अमेरिकेने नागरिकांना दिलाय ‘हा’ महत्वाचा इशारा.. जाणून घ्या..

दिल्ली : युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील सतत वाढत असलेल्या तणावा दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक नवीन विधान जारी केले आहे. बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने युक्रेनच्या संकटाच्या परिस्थितीबाबत हे विधान केले आहे.

Advertisement

याआधी, युक्रेनच्या संकटावर अमेरिकेने बैठक बोलावण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मंजूर करण्यात आला होता. यादरम्यान यूएनएससीच्या बैठकीत अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांत जोरदार वाद झाले, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. युक्रेनच्या मुद्द्यावर पश्चिमी देश तणावात वाढ करत असल्याचा आरोप रशियाने केला, तर अमेरिकेने युक्रेनच्या सीमेवर 1,00,000 रशियन सैन्य जमा करण्यास आक्षेप घेतला.

Advertisement

रशियाचे राजदूत नेबेन्झिया यांनी युक्रेनच्या मुद्द्यावरून पाश्चात्य देशांवर तणावात वाढ केल्याचा आरोप केला. प्रत्युत्तरादाखल, अमेरिकेचे राजदूत थॉमस-ग्रीनफिल्ड म्हणाले, की युक्रेनियन सीमेवर 1 लाखांपेक्षा जास्त रशियन सैन्याची जमवाजमव हा युरोपमधील काही वर्षांतील सर्वात मोठी घटना आहे.

Loading...
Advertisement

डिसेंबर 2021 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन क्षेत्राजवळील वाढत्या तणावाबाबत फोनवर चर्चा केली होती. या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे फोनवर चर्चा झाली. या दरम्यान जो बायडेन म्हणाले की, जर रशियाने युक्रेनवर आणखी आक्रमण केले तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश प्रत्युत्तर देतील.

Advertisement

दरम्यान, युक्रेनच्या संदर्भात, रशियाने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोकडे मागणी केली की रशियाच्या जवळचे देश जोडले जाऊ नयेत आणि नवीन नाटो सदस्यांच्या समावेशावर बंदी घालावी. रशियाचे प्रमुख प्रस्ताव अमेरिकेने फेटाळले आहेत. मात्र, शस्त्रास्त्र नियंत्रणासारख्या मुद्द्यांवर रशियाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास आम्ही रशियावर याआधी कधीही न पाहिलेले असे कठोर निर्बंध लादू, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पाश्चिमात्य देशांना रशियाविरुद्ध एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

आता अमेरिका आणि जर्मनीने रशियाला धमकावले.. ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देश रशियाच्या विरोधात

Advertisement
Advertisement

Leave a Reply