Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फ्रान्सनंतर ब्रिटेनला रशियाने दिला झटका..! ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देशांत जोरदार वाद; पहा, नेमके काय घडलेय ?

दिल्ली : युक्रेनच्या मुद्द्यावर रशिया आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांची गुरुवारी मॉस्कोमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत युक्रेन सीमेवरून रशियन लष्करी जमाव हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ब्रिटीश परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला असताना, त्यांचे रशियन समकक्ष, सर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांचा उपदेश आणि धमक्या स्वीकारत नसल्याचे सांगितले.

Advertisement

लाव्हरोव्ह म्हणाले, की या समस्येच्या वैचारिक आणि नैतिक मुद्द्यांकडे लक्ष दिले जात नाही. केवळ धमक्या दिल्या जात आहेत. रशिया आणि ब्रिटनमधील संबंध चांगले राहिलेले नाहीत. बैठकीत या दोन्ही अधिकाऱ्यांत चांगलेच वाद झाले. ट्रस यांनी रशियन सैन्याला युक्रेनच्या बॉर्डरपासून दूर पाठवण्यास सांगितले, तर लॅव्हरोव्हने ते अयोग्य म्हटले आणि पूर्व युरोपमध्ये ब्रिटिश आणि नाटो सैन्याच्या तैनातीबद्दल प्रश्न उपस्थित केला.

Advertisement

लावरोव्ह म्हणाले, जर रशियाच्या कोणत्याही भागात रशियन सैन्य तैनात असेल तर कोणीही त्याची काळजी करण्याची गरज नाही. आम्हाला या प्रकरणी कोणाचीही धमकी ऐकायची नाही. खरोखर कोणाला धोका आहे हे पाहावे लागेल. रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, की पाश्चात्य राजकीय नेते युक्रेनचा मुद्दा उपस्थित करत आहेत आणि त्यांच्या देशांतर्गत राजकारणामुळे तणाव वाढत आहे. त्यामुळेच ते रशियाला सैन्य मागे घेण्यासाठी धमक्या देत आहेत आणि दबाव आणत आहेत. असे करून त्यांना त्यांच्या देशाला संदेश द्यायचा आहे की त्यांनी रशियाला माघार घ्यायला लावली.

Advertisement

बेलारूसला पोहोचलेल्या 30 हजार रशियन सैनिकांचा सैन्य अभ्यास तेथे सुरू आहे. युक्रेन बॉर्डरजवळ होणारा हा सराव देखील महत्त्वाचा आहे कारण तेथून युक्रेनची राजधानी कीवचे अंतर फक्त 75 किलोमीटर आहे. रशियाने अलीकडच्या काही दिवसांत बेलारूसमध्ये आण्विक-सक्षम बॉम्बर, S-400 हवाई संरक्षण यंत्रणा आणि इतर प्राणघातक शस्त्रे तैनात केली आहेत.

Loading...
Advertisement

रशियन आक्रमणाच्या धोक्याचा सामना करत असलेल्या युक्रेनला गुरुवारी 80 मेट्रिक टन वजनाची लष्करी मदत मिळाली. युक्रेनला दोन विमानांद्वारे ही शस्त्रे मिळाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने युक्रेनला 45 विमान लष्करी साहित्य देण्याची योजना आखली आहे. यापैकी दहा विमाने आतापर्यंत युक्रेनमध्ये पोहोचली आहेत. याशिवाय ब्रिटन आणि लिथुआनियानेही युक्रेनला लष्करी साहित्य पाठवले आहे.

Advertisement

रशिया, युक्रेन, फ्रान्स आणि जर्मनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी पुन्हा एकदा जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये बैठक झाली. यामध्ये युक्रेन सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा झाली. यापूर्वी 26 जानेवारीलाही चार देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. सकारात्मक चर्चेनंतरच भविष्यात पुन्हा भेट घेण्याचे मान्य करण्यात आले.

Advertisement

भारत-चीनच्या वादात रशिया घेणार एन्ट्री..? ; पहा, काय उत्तर दिलेय भारताच्या ‘या’ मित्र देशाने..

Advertisement
Advertisement

Leave a Reply