अर्र.. हेही संकट आहेच का..! पहा, जागतिक तापमानवाढीचा समुद्रावर कसा पडलाय इफेक्ट..?
दिल्ली : सध्या ग्लोबल वॉर्मिंग ही एक मोठी समस्या आहे जी संपूर्ण जगाला भेडसावत आहे. आणखी एक चिंताजनक गोष्ट आता समोर आली आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे, की 2014 पासून, समुद्राच्या अर्ध्याहून अधिक भागाने ऐतिहासिक उष्णतेची कमाल मर्यादाही पार केली आहे. पीएलओएस क्लायमेट या जर्नलमध्ये हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
ही अत्यंत धक्कादायक आणि धोक्याची गोष्ट आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळे आपल्या समुद्री परिस्थितीचे तंत्र उद्धवस्त होण्याची भीती आहे. ज्यात प्रवाळ खडक, समुद्री घास, केल्प वन यांचा समावेश आहे. त्यांच्या संरचनेत आणि कार्यपद्धतीत होणाऱ्या बदलांमुळे आणि त्यांना धोका निर्माण झाल्यामुळे मानवालाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, जे त्यांच्यावर अवलंबून आहेत.
समुद्राच्या उष्णतेचा निश्चित अंदाज येण्यासाठी संशोधकांनी महासागरांच्या वरील बाजूच्या 150 वर्षांच्या तापमानाचा अभ्यास केला. यामध्ये शास्त्रज्ञांनी महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमान किती वेळा आणि किती प्रमाणात या बिंदूच्या पुढे गेले आहे हे पाहिले. ऐतिहासिक नोंदी वापरून, शास्त्रज्ञांनी प्रथम 1870 ते 1919 दरम्यान महासागरांच्या पृष्ठभागामध्ये झालेली वाढ शोधून काढली. त्यात त्यांना या काळात सर्वाधिक केवळ दोन टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. डॉ. काइल यांच्या मते, सध्या बहुतांश महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे, जे गेल्या शतकात दुर्मिळ होते. गेल्या 50 वर्षांत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
डॉ. काइल यांच्या मते, जेव्हा उष्ण कटिबंधाजवळील सागरी परिसंस्था असह्यपणे सर्वाधिक तापमान अनुभवतात, तेव्हा प्रमुख जीव जसे की कोरल, समुद्री घास, केल्पवन संकटात सापडू शकतात. इकोसिस्टमच्या संरचनेत आणि कार्यामध्ये बदल झाल्यामुळे मत्स्यपालनाला धोका निर्माण होईल. पहिल्या वर्षी 2014 मध्ये, निम्म्याहून अधिक महासागरांनी सर्वाधिक तापमान अनुभवले. त्यानंतरच्या वर्षांत हा ट्रेंड कायम राहिला. 2019 मध्ये, ते 57 टक्के महासागरांमध्ये पसरले.
अभ्यासाचे प्रमुख डॉ. काइल व्हॅन हौटेन यांच्या मते, हवामान बदल ही भविष्यातील घटना नाही. वास्तव हे आहे की गेल्या काही काळापासून त्याचा परिणाम आपल्यावर होत आहे. आमचा अभ्यास असे सांगतो, की निम्म्याहून अधिक समुद्राच्या पृष्ठभागाने ऐतिहासिक उष्णतेची तीव्रता पार केली आहे. समुद्राच्या तापमानात नोंदलेला हा बदल हा आणखी एक पुरावा आहे जो आपल्याला सतर्क राहण्यास सांगतो. आगामी काळात ते आणखी भीषण स्वरूप धारण करेल, ही विचार करणारी गोष्ट आहे.
अर्र.. हेही संकट आहेच का ?..! पहा, जागतिक तापमानवाढीचा कसा होतोय ‘इफेक्ट’..