बाब्बो.. कॅनडातील आंदोलनांमुळे घाबरला फ्रान्स..! घेतलाय अत्यंत कठोर निर्णय; जाणून घ्या, काय आहे प्रकार..?
दिल्ली : कॅनडामध्ये ज्या प्रमाणे मोठे निदर्शने झाला तशाच प्रकारच्या आंदोलनाचा धोका युरोपिय देश फ्रान्समध्ये निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत येथील पोलिसांनी गुरुवारी सांगितले, की ते कोरोना व्हायरस निर्बंधांविरूद्ध कॅनडाची राजधानी ओटावामध्ये झालेल्या ‘फ्रीडम कॉन्वॉय’ (Freedom convoys) वर येथे बंदी घालत आहेत. ट्रक चालकांच्या या आंदोलनामुळे ओटावा शहर पुर्णपणे ठप्प झाले आहे. शहर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “प्रमुख रस्त्यांवर जाम टाळण्यासाठी, तिकिटे जारी करण्यासाठी आणि या विरोध प्रतिबंधांचे उल्लंघन करणार्यांना अटक करण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
रस्ता अडवणाऱ्यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, त्याला 4,500 युरो (सुमारे 3,85,609 रुपये) आणि तीन वर्षांची ड्रायव्हिंग बंदी देखील ठोठावण्यात येणार आहे. बुधवारी फ्रान्सच्या आजूबाजूला कार, व्हॅन आणि मोटारसायकलचे अनेक काफिले दिसल्यानंतर पॅरिस पोलिसांनी हा निर्णय घेतला. या वाहनांसह, लोक फ्रान्सच्या राजधानीत जमा होण्यास तयार आहेत. हे लोक कॅनडातील प्रदर्शनांनी प्रेरित आहेत. खरे तर, कॅनडामधील ट्रक चालकांना अमेरिकेची बॉर्डर पार करण्यासाठी कोविड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे त्यांनी ओटावा येथे निदर्शने केली.
फ्रान्समधील इतर शहरांतील लोक राजधानीच्या शहरात येण्याची शक्यता आहे. पॅरिस प्रांताने सांगितले की, सार्वजनिक अव्यवस्था होण्याचा धोका दर्शवून आंदोलकांना 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत राजधानीत प्रवेश करण्यास बंदी घातली जाईल. दक्षिणेकडील फ्रेंच शहर बायोने येथे अशा प्रदर्शनात भाग घेतलेल्या एहांडे अबेरी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले, की सामान्य जीवनातील घडामोडींसाठी वैक्सीन पास अनिवार्य करण्याचा सरकारचा निर्णय योग्य नव्हता.
फ्रेंच सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अट्टल म्हणाले की, विषाणू संदर्भात उचललेल्या पावलांमुळे लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतु युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये लोकांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे कमीत कमी निर्बंध आहेत, असा त्यांनी सांगितले.
रशियाने फ्रान्सलाही दिलाय जोरदार झटका..! ‘त्या’ संकटावर मार्ग काढण्याचा प्लानही गेला फेल..