Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog : करोना.. व्हायरस.. मृत्यू.. आणि आपण सगळे..

हे मृत्यो ! व्हायरस जिवंत असतो की मेलेला हे अजुन नीटसे कळलेले नाही. पण व्हायरस सर्वत्र असतो. जसा देव असतो, भूत असते, तसे व्हायरस पण असतो ! त्याला योग्य परिस्थिती निर्माण झाली की तो आपले काम करायला सुरुवात करतो. सध्या सुरू असलेल्या करोना पुराणामध्ये हा व्हायरस श्वसन यंत्रणेवर हल्ला करतोय. त्यामुळे रुग्णाच्या शरीराला मिळणारा प्राणवायू कमी झाला की त्याचे इतर महत्वाचे अवयव जसे की, हृदय, किडनी, लिव्हर, मेंदू हे निकामी होत जातात, अन् रुग्ण मृत्यू पावतो. मरणे काही वाईट नाही. मरण हे अटळ आहे. जो जनमाला आला, तो मरणारच आहे! (ही वाक्य वाचली तर विज्ञानाला अध्यात्माचा व्हायरस चावला की काय अशी शंका येईल!)

Advertisement

लेखक : डॉ. भारत करडक (संचालक, नेवासा तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., करडकवाडी, नेवासा फाटा, नेवासा, अहमदनगर)

Loading...
Advertisement

पुणे नाशिक प्रवासात मला आदरणीय अविनाश धर्माधिकारी सरांसोबत चर्चेची संधी मिळाली (यावर सरांचे वेगळे मत असू शकते). त्यात, मरणाला माणसाने भिवू नये, मात्र मरण येताना ते मोठ्या कारणासाठी यावे, नोबेल कॉज साठी यावे, या माझ्या वाक्याला सरांनी दाद दिली. व्हायरस चावून भारत करडक मेला, हे मृत्यू पेक्षा देखील वेदनादायी आहे. अर्थात अजुन मृत्यु पहिला नसल्याने असे मला वाटतं असावे.  (जुही पासून आलिया पर्यंतची सर्व कॉज आता संपल्याने मला तरी मृत्युसाठी वैयक्तिक काही सुंदर cause मिळेल याचे काही खरे दिसत नाही!)  तर हा व्हायरस, याला मारण्यासाठी जी लस/औषिध बनवावे लागते ते कसे बनवतात. दर तीन महिन्यांनी जगातले शास्त्रज्ञ हवेचे नमुने तपासून काही नवीन व्हायरस जनमला आलेत का ते तपासत असतात. त्यात जर काही आढळले तर त्या व्हायरस चे केमिकल structure काय आहे, ते बघतात. Structure Activity Relationship (SAR) नुसार त्याच्या वाढीला रोखेल असे केमिकल शोधले जाते. अस्तित्वात नसेल, तर नव्याने बनवले जाते. Synthesise केले जाते. त्याची परिक्षानळीत तपासणी होते, मग जिवंत प्राण्यांवर तपासणी होते व नंतर माणसांवर क्लिनिकल ट्रायल होते. ही प्रक्रिया किचकट अन् खर्चिक असते. म्हणून vaccine आपल्याला महाग मिळतात.

Advertisement

कुठलेही औषध हे याच प्रक्रियेतून तयार होते. त्यासाठी खूप वेळ अन् पैसे खर्च होतात. अनेक शास्त्रज्ञ अनेक वर्ष त्यासाठी काम करत असतात. मी स्वतः २००९ साली शोधलेले औषध अजुन क्लिनिकल ट्रायल मध्ये जायचे आहे. एक औषध बनवायला जवळपास सोळा वर्षे लागतात. कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण व्हायरस वर लस शोधताना इतका वेळ थांबलो तर ती लस द्यायला अन् घ्यायला कुनीच उरणार नाही. म्हणून हे काम युद्धपातळीवर आधुनिक पद्धतीने चाचण्या घेवून केले जाते. कमी वेळेत जास्त पैसे खर्च होतात.  यावर सामान्य माणूस म्हणून आपल्या हाती काहीच नाही, असे नाही. आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हाच उपाय आहे. पूर्वीच्या प्रथा परंपरा यांना नाके मुरडत असलो तरी ते सगळेच वाईट नसते. जुन्या समाज धुरिणांनी, लोक ऐकत नाहीत म्हणून काही गोष्टी *ते देवाचं असतय* असं सांगून आपल्याला करायला भाग पडलेले असते. वैज्ञानिक अधिष्ठान नसलेल्या परंपरा काळाच्या ओघात टिकत नाहीत. त्या रद्द च केल्या पाहिजेत. निसर्ग ती काळजी घेतो. भारतीय जेवणात हळदीला महत्त्व आहे. वरणा पासून तांबड्या पांढऱ्या रस्स्या पर्यंत सगळीकडे हळद वापरली जाते. आदरणीय डॉ. रघुनाथ माशेलकर सरांनी याचे पेटंट भारताला मिळवून दिलेले आहे. उपकार केलेले आहेत.  तर ही हळद, दररोज दूध अन् गुळासोबत काढा करून किमान एकदा घेतली तरी तुम्हाला अनेक व्हायरस पासून वाचवू शकेल. हळदी पेक्षा जास्त पावरफुल (पवार फुल नाही) दुसरे Disinfectant नाही. हळदी मधील कुर्कुमीन हा घटक बहुतेक औषधामध्ये सापडतो. नव्हे त्याला पर्याय नाही.  तर असा हा आजीबाई च्या बटव्यातील उपाय तुम्ही करावा. आमची आजी आशीर्वाद देताना म्हणायची. . . .म्हातारे व्हा !! तुम्हाला जिवंत राहण्यासाठी शुभेच्छा .. पूर्वी bsc Corona हा शूज चा ब्रॅण्ड होता..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply