Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया दौऱ्याआधीच पाकिस्तानला जोरदार झटका..! काश्मीर प्रश्नी रशियाने दिलेय ‘हे’ उत्तर..

दिल्ली : जागतिक राजकारणात पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. चीननंतर आता रशियानेही पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीर प्रकरणी रशिया हस्तक्षेप करील असे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, रशियाने अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले, की हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय आहे. रशियाचे धोरण स्पष्ट आहे, की रशिया द्विपक्षीय प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात रशिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच रशियाने केलेले हे वक्तव्य पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

चीन दौऱ्यातही पाकिस्तानने काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाने त्यास दाद दिली नाही. कोणत्याही हस्तक्षेपास स्पष्ट शब्दांत नकार दिला. रशियाने हेही स्पष्ट केले आहे, की काश्मीर प्रकरणी त्याच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारत आणि पाकिस्तानलाच या मुद्द्यावर मार्ग काढावा लागणार आहे. याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तालिबानच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे. साधारण पुढील महिन्यात इम्रान खान रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. काश्मीर प्रश्नी तिसरा पक्ष मध्यस्थी असण्याचा मुद्दा पाकिस्तान वारंवार उपस्थित करत आहे. मात्र, भारतास हे आजिबात मान्य नाही.

Loading...
Advertisement

याआधी इम्रान खान यांनी आपल्या चीन दौऱ्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना काश्मीर प्रकरणी दखल देण्याचा आग्रह केला होता. यावर जिनपिंग यांनी चीन कोणत्याही एकतर्फी कारवाईस विरोध करतो, असे म्हटले होते. दोन्ही देशांनी या प्रश्नावर योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. चीनकडून मिळालेला अनुभव ताजा असतानाच आता रशियानेही  या प्रकरणी हस्तक्षेप करावा असे पाकिस्तानला वाटत होते. मात्र, आता रशियानेही अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात पाकिस्तान सध्या कोणत्या परिस्थितीत आहे, याचा अंदाज येतो.

Advertisement

चीन दौऱ्याआधीच पाकिस्तानला बसलाय झटका.. रशियाने केलेय ‘असे’ काही; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply