Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जगात अजूनही कोरोनाचे थैमान सुरुच..! पहा, जगातील कोणत्या देशात आहेत सर्वाधिक रुग्ण..?

दिल्ली : जगात अजूनही कोरोना या घातक आजाराचे थैमान सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. Omicron मुळे जगभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 39.7 कोटींच्याही पुढे गेली आहे. तर या घातक आजारामुळे 57.4 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना जगातील 10.7 अब्ज लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली गेली आहे.

Advertisement

हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली आहे. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अँड इंजिनीअरिंग (CSSE) ने एका नवीन अपडेटमध्ये सांगितले, की सध्याची जागतिक प्रकरणे 3,97,053,590 आहेत, तर मृत्यू संख्या 5,749,136 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, एकूण 10,071,840,40 लसीकरण करण्यात आले आहे.

Advertisement

अमेरिका हा जगातील सर्वाधिक (76,848,718) प्रकरणे आणि मृत्यू (905,521) सह सर्वाधिक प्रभावित देश आहे. कोरोना प्रकरणांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश आहे, जिथे कोरोनाचे 42,272,014 रुग्ण आहेत तर 502,874 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर ब्राजीलमध्ये 26,616,014 कोरोनाची प्रकरणे आहेत तर 632,946 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

CSSE डेटानुसार, 50 लाखांपेक्षा अधिक प्रकरणे असलेले इतर देश फ्रान्स (20,933,062), ब्रिटेन (17,923,805), रशिया (12,612,259), तुर्की (12,238,501), इटली (11,663,338), जर्मनी (11,059,69,170), अर्जेंटिना (8,589,879), इराण (6,579,266), कोलंबिया (5,966,706) आणि मेक्सिको (5,141,291) आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असेल. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे, की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असेल परंतु भविष्यातील प्रकार कमी प्राणघातक असतील याची शाश्वती नाही.

Advertisement

मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घालत आहे. हा घातक आजार संपणार तरी कधी, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनाबाबत महत्वाची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यांनी म्हटले होते, की जर जागतिक समुदायाने व्यापक उपाययोजना केल्या तर 2022 मध्ये कोरोना आजार संपुष्टात येऊ शकतो. टेड्रोस म्हणाले की WHO राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर पुरावे, धोरण, उपकरणे आणि तंत्रज्ञानासह काम करत आहे.

Advertisement

बापरे.. ‘या’ देशात कोरोनाने उडालाय हाहाकार..! ‘त्या’ गोष्टीमुळेही वाढलेय सरकारचे टेन्शन.. पहा, काय आहे परिस्थिती..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply