बापरे.. ‘या’ देशात कोरोनाने उडालाय हाहाकार..! ‘त्या’ गोष्टीमुळेही वाढलेय सरकारचे टेन्शन.. पहा, काय आहे परिस्थिती..?
दिल्ली : जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे रशियात सध्या अत्यंत घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश हादरला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 1,65,643 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले आहेत. मात्र, आदल्या दिवशी म्हणजेच कालच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. एका दिवसाआधी देशात 1,71,905 प्रकरणे होती, तर 698 मृत्यूची नोंद झाली होती.
फेडरल रिस्पॉन्स सेंटरने मंगळवारी सांगितले की, ‘कोविड-19 ची 1,65,643 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, तर गेल्या 24 तासांत 698 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, प्रतिसाद केंद्राने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोविड-19 ने संक्रमित झालेल्या 20,185 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका दिवसाआधीच्या तुलनेत येथे ही संख्या 86.2 टक्क्यांहून अधिक आहे. त्याच बरोबर, प्रतिसाद केंद्रानुसार, 81,188 कोविड-19 रूग्णांमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मॉस्को देशात सर्वाधिक प्रभावित शहर ठरले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असेल. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे, की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असेल परंतु भविष्यातील प्रकार कमी प्राणघातक असतील याची शाश्वती नाही.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घालत आहे. हा घातक आजार संपणार तरी कधी, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनाबाबत महत्वाची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यांनी म्हटले होते, की जर जागतिक समुदायाने व्यापक उपाययोजना केल्या तर 2022 मध्ये कोरोना आजार संपुष्टात येऊ शकतो. टेड्रोस म्हणाले की WHO राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर पुरावे, धोरण, उपकरणे आणि तंत्रज्ञानासह काम करत आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, की जर देशांनी या सर्व रणनीती आणि साधनांचा सर्वसमावेशक वापर केला तर आपण या वर्षी कोरोनाच्या कठीण परिस्थितीवर मात करू शकू. WHO कार्यकारी मंडळाच्या 150 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी टेड्रोस म्हणाले की, अशा आपत्कालीन परिस्थितींना रोखण्यासाठी साथीच्या रोगापासून धडे घेण्याची आणि नवीन उपाय विकसित करण्याची गरज आहे. यासाठी आपण आजार संपेपर्यंत थांबू नये, असे त्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचे आणखीही काही व्हेरिएंट निर्माण होण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ‘या’ राज्यात अलर्ट; आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन आदेश जारी; जाणून घ्या..