Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-चीनच्या मैत्रीने अमेरिकेचा तिळपापड..! संतापलेल्या अमेरिकेने ड्रॅगनला दिलाय ‘हा’ धोक्याचा इशारा

दिल्ली : युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढत असताना या वादात आता चीनने एन्ट्री घेतली आहे. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्ताने रशिया आणि चीनने संयुक्त निवेदन दिले होते. या निवेदनात अमेरिका व त्याच्या मित्र देशांनी नाटोचा विस्तार थांबवावा, अशी मागणी या दोन्ही देशांनी केली होती. तसेच अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांवर चिंता व्यक्त केली गेली आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या आणखी विस्ताराला विरोध केला.

Advertisement

त्यानंतर आता अमेरिकेनेही चीन आणि रशियाच्या या मैत्रीवर जोरदार प्रहार केला आहे. तसेच या दोन्ही देशांना इशाराही दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने एका निवेदनात म्हटले आहे की, युरोपमधील संघर्षाचा चीनच्या हितावर परिणाम होईल. व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी स्पष्ट केले की, जर युरोपमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फटका चीनलाही सहन करावा लागेल. याचा परिणाम जगभरातील चीनच्या हितावर होणार आहे, अर्थातच चीनने हे समजून घेतले पाहिजे. अमेरिकेच्या सेक्रेटरीचा हवाला देत हे विधान अशावेळी आले आहे ज्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि त्यांचे समकक्ष व्लादिमीर पुतिन एका शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत.

Advertisement

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॅनियल क्रिटनब्रिंक यांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेन सीमेवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी चीन धोरण घेऊ शकतो. कारण, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आहे. या बैठकीत ते म्हणाले, की चीनने संधीचा फायदा घेऊन युक्रेनमधील मुत्सद्देगिरी आणि तणाव कमी करण्यासाठी रशियाला शिफारस करावी. सध्याच्या शक्तिशाली देशांकडून संपूर्ण जगाला हेच अपेक्षित आहे. त्याच वेळी, रशिया आणि चीनने संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांचा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) च्या विस्ताराला विरोध आहे.

Loading...
Advertisement

चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीबाबत अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर चीन आणि रशिया यांच्यातील मैत्रीची भरपाई होऊ शकणार नाही, असे अमेरिकेचे मत आहे. युक्रेनवर आक्रमण झाले तर रशियाचा मित्र चीनही त्याची मदत करू शकणार नाही. यामुळे रशियन अर्थव्यवस्था आणखी नष्ट होईल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

Advertisement

राजकारण फिरले..! अमेरिकेविरोधात चीन-रशिया आले एकत्र; ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेला दिलीय धमकी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply