Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर अमेरिकेने ‘ते’ अपयश मान्य केलेच..! पहा, कोणते संकट अमेरिकेलाही रोखता आले नाही..

दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तान मधून माघार घेतल्यानंतर या देशातील तालिबानी राजवटीत परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका लाखो अफगाण नागरिकांना बसला आहे. आता ते तालिबानी राजवटीत अत्यंत संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेनेही आपले अपयश मान्य करणे सुरू केले आहे. आताही अमेरिकेने हे मान्य केले आहे, की अफगाणिस्तान मध्ये 26 ऑगस्ट रोजी झालेला हमला रोखण्यात अपयशी ठरलो.

Advertisement

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, की ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तान मधून बाहेर पडत असताना 13 यूएस लढाऊ दल आणि 170 अफगाण रहिवासी आत्मघाती बॉम्बस्फोटांना बळी पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार या हमल्यात 20 पौंड स्फोटक सामग्री वापरण्यात आली होती. एका न्यूज एजन्सीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख फ्रँक मॅकेन्झी यांनी म्हटले आहे की, 26 ऑगस्ट रोजी झालेला हमला रोखण्यात ते अपयशी ठरले.

Advertisement

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी सुरक्षा चौक्या पार करुन अमेरिकन लष्कराच्या सुरक्षा चौक्यांना धडक दिली आणि स्फोट घडवून आणला. हा हमला झाल्यानंतर लोकांना इशारा देण्याच्या उद्देशाने अमेरिकी आणि ब्रिटिश सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला होता. याचा उद्देश कुणाचेही नुकसान करणे असा नव्हता. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरावर अमेरिकन ड्रोनने हमला केला. या घटनेत तीन मुलांसह 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Loading...
Advertisement

दरम्यान, अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवटीत देशाची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तालिबानने सरकार गठीत केले असले तरी पैसे नसल्यामुळे देश चालवायचा कसा, असा प्रश्न आहे. तालिबान्यांच्या सध्याच्या कारवायांमुळे जगाने मदतीचे दरवाजे बंद केले आहेत. अशा परिस्थितीत आता अमेरिकेनेच अफगाणिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी अमेरिकेने मदत देण्यास नकार दिला होता. आता मात्र, मानवतेच्या आधारावर अफगाणिस्तान मधील नागरिकांसाठी 30.8 कोटी डॉलर अतिरिक्त मदत देणार असल्याचे अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. याआधीही अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी मदत जाहीर केली होती.

Advertisement

अफगाणिस्तान मधील लोकांच्या कल्याणासाठी हे पैसे खर्च करण्यात येणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानी राजवटीत येथील नागरिकांचे अत्यंत हाल होत आहेत. तालिबानच्या या कारवायांवर जगानेही मौन साधले आहे. काळजी व्यक्त करण्या पलीकडे फारसे काहीही होत नाही. या देशातील सध्याची परिस्थिती पाहता जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

भारताचा मास्टरस्ट्रोक..! पाकिस्तान मार्गेच भारत अफगाणिस्तानला देणार मदत; पाकिस्तानचा ‘तो’ प्लानही फेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply