Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेचा प्लान उघड..! रशियाने ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेवर केलाय गंभीर आरोप; पहा, काय सुरू आहे वाद

दिल्ली : युक्रेनच्या मुद्द्यावरून नाटो देशांसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे. या मुद्द्यावर पुतिन यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. रशिया विरोधात अमेरिका युक्रेनचा वापर करत आहे, रशियाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. याबरोबरच युक्रेन संकटामुळे निर्माण झालेला तणाव संपवण्यासाठी रशिया आणि पाश्चात्य देश तोडगा काढू शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. रशिया सध्या अमेरिका आणि नाटो देशांच्या प्रतिसादाचा विचार करत आहे, असेही पुतीन म्हणाले.

Advertisement

पुतिन म्हणाले की, अमेरिका आणि नाटोकडून मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे पुरेशी नाहीत. रशियाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांकडे अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेन संकटामुळे रशिया आणि पाश्चिमात्य देशांदरम्यान एक महिन्याहून अधिक काळ तणाव आहे. या मुद्द्यावर पहिल्यांदाच विधान करताना पुतिन आक्रमकपणे मत व्यक्त केले. रशियाच्या मागण्यांकडे पाश्चात्य देश लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पुतीन म्हणाले.

Advertisement

या मागण्यांमध्ये युक्रेन आणि इतर माजी सोव्हिएत राष्ट्रांमध्ये नाटोच्या विस्तारास थांबवणे आणि रशियन सीमेवर घातक शस्त्रे तैनात करणे थांबवणे यांचा समावेश आहे. मात्र, अमेरिकेने रशियाच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. पुतिन म्हणाले, की तणाव कमी करण्यासाठी ते अधिक चर्चेसाठी तयार आहेत. नाटो देशांनी रशियाला हमी द्यायला हवी की ते नाटोचा विस्तार करणार नाहीत आणि शस्त्रास्त्रांची तैनाती करणे थांबवतील, असेही त्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

ते म्हणाले, की नाटो देशांनी त्यांच्या लष्करी स्थितीवर परत यावे, जी 1997 मध्ये होती. अमेरिकेला युक्रेनच्या सुरक्षेची काळजी आहे असे वाटत नाही. रशियाचा विकास रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.’ युक्रेनच हे उद्दिष्ट साध्य करू शकेल, असे ते म्हणाले. पुतिन म्हणाले, ‘मला अपेक्षित आहे की शेवटी आपण काहीतरी तोडगा काढू.’ ते म्हणाले की, रशियावर निर्बंध टाकणे फारसे प्रभावी नाही.

Advertisement

.. म्हणून रशियाने मानलेत भारताचे आभार.. पहा, जागतिक राजकारणात भारताने केले तरी काय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply